परशा आणि रणवीर दिसले एकत्र... बघा कुठे!

वृत्तसंस्था
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

सैराट फेम परशा म्हणजेच आकाशला सेट-वेट ची जाहिरात मिळाली असून त्यात तो 'बाजीराव' रणवीर सिंग सोबत दिसत आहे. आकाशने हा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर अपलोड केला आहे.

'सैराट' फेम आकाश ठोसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'सैराट', 'एफ यू' या चित्रपटात झळकलेल्या आकाशला रणवीर सिंग सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आकाश एका हटके जाहिरातीत रणवीरसोबत दिसेल.  

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

'पानिपत'ची लढाई आशुतोष जिंकणारच! : राज ठाकरे  

सैराट फेम परशा म्हणजेच आकाशला सेट-वेट ची जाहिरात मिळाली असून त्यात तो 'बाजीराव' रणवीर सिंग सोबत दिसत आहे. आकाशने हा व्हिडिओ इन्स्ट्राग्रामवर अपलोड केला आहे. तर 'सदा सेक्सी रहो' असं कॅप्शन देत रणवीर सिंगलाही टॅग केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sada Sexy Raho Man @ranveersingh @rajeshsaathi @setwetstyling @keroscenefilms @aalimhakim #setwet

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

सध्या आकाशच्या मेक ओव्हर ची चर्चा जोरात सुरु आहे. त्यानं हा लुक कशासाठी केला आहे, हे मात्र अद्याप गुढच आहे. सैराट नंतर आकाश पुन्हा एकदा दिग्दर्शक नागराज मंजुळे सोबत काम करणार आहे. मंजुळेच्या "झुंड" या चित्रपटात तो भूमिका साकारतोय. यात अमिताभ बच्चन महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 13 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

म्हणून अनुष्का वापरते विराटचे कपडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer Singh and Akash Thosar together in Set Wet advertisement