दीपिका रणवीर 'या' तारखेला करतील विवाह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

2018 मध्ये हे कपल लग्नं लवकरच करणार असल्याच्या अफवाही पसरल्या आणि ही आता अफवा खरीही ठरली आहे. 

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे स्टनिंग बॉलिवूड कपल साध्या पार्टी निमित्तही एकत्र दिसलं तरी त्यांची चर्चा असते. सिनेमा किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये सोबत काम करायचं म्हटलं तर विचारायलाच नको. 'रामलीला' सिनेमातून एकत्र झळकल्यानंतर तर या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आणि त्यांचा चाहता वर्ग आतापर्यंत लग्नाची गोड बातमी ऐकण्यासाठी आतूर आहे.

गेली पाच वर्षापासून सुरु असलेलं हे अफेअर बॉलिवूडचं मोस्ट फेवरेट अफेअर राहीलं आहे. दीपिका आणि रणवीरने कधी खुलेपणानं या नात्याविषयी बोलण्याचं टाळलं असलं तरी त्यांच्या नेहमी एकत्र दिसण्याला चाहत्यांनी नेहमीच पसंत केलं आहे. 2018 मध्ये हे कपल लग्नं लवकरच करणार असल्याच्या अफवाही पसरल्या आणि ही आता अफवा खरीही ठरली आहे. 
deepika padukone

या वर्षी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लग्नबंधनात अडकणार आहे. 'फिल्मफेअर'ने प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार येत्या 10 नोव्हेंबरला ते लग्नबंधनात अडकतील. आपल्या लग्नात सर्व गोष्टी अगदी नियोजनबध्द पध्दतीने व्हाव्यात यासाठी दोघेही प्रयत्न करत आहेत. 

लग्नाबाबत काही अधिकृत घोषणा झालेली नाही. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा लग्नसोहळा पार पडेल. त्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही कळत आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer singh and deepika padukones marriage date is announced