दीपिका पदूकोणला भेटायला पोहोचलेल्या रणवीर सिंहच्या फॅशन सेन्सची झाली चर्चा

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 1 December 2020

रणवीर सिंह दक्षिण मुंबईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दीपिकाला भेटण्यासाठी पोहोचला. या दरम्यान रणवीरने केलेल्या पेहरावामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

मुंबई- दापिका पदूकोण गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत सिनेमा शूट करतेय. मंगळवारी सकाळी दीपिका शूटींगसाठी अलिबागला जायला निघाली. मात्र आज सकाळी शूटींगवर निघण्याआधी रणवीर सिंह,दीपिकाला भेटण्यासाठी आला. रणवीर सिंह दक्षिण मुंबईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दीपिकाला भेटण्यासाठी पोहोचला. या दरम्यान रणवीरने केलेल्या पेहरावामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

हे ही वाचा: बिग बॉस १४: विवाहीत आहे पवित्रा पुनिया, पती सुमित महेश्वरीने केले धक्कादायक खुलासे   

रणवीर सिंह त्याच्या हटके फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असतो.गेले अनेक दिवसांत त्याचा वेगळा लूक पाहायला मिळाला नव्हता. मात्र आता रणवीर सिंहच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्या फॅशन सेन्सने वेड लावलंय. दीपिकाला भेटायला गेलेल्या रणवीर सिंहने त्याच्या पेहरावामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 

Ranveer Singh, Deepika Padukone, Ranveer Singh enjoys quality time Deepika Padukone,   Siddhant Chaturvedi, Ranveer Singh Fashion sense, News 18, Network 18, Social Media, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, दीपिका से मिलने पहुंचे रणवीर

रणवीर सिंहच्या आऊटफिटबद्दल सांगायचं झालं तर त्याने ब्लॅक आणि रेड प्रिंटेड कॉम्बिनेशनचा ट्रॅक सूट घातला होता. तर दीपिकाने सफेद क्रॉप टॉप आणि ब्लॅक ट्रॅक घातली होती. दीपिकाला सोडताना दोघांनी एकमेकाला किस करत बाय केलं. रणवीर आणि दीपिकाचा हा लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. पॅपराझी दरम्यान दीपिका सहकलाकार सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्पीड बोटमध्ये सोबत दिसली. रणवीर आणि दीपिकाच्या चाहत्यांना आता त्यांच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे.    

ranveer singh enjoys quality time with wife deepika padukone before she sails for film shoot  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh enjoys quality time with wife deepika padukone before she sails for film shoot