दीपिकानंतर आता रणवीर सिंह सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटींगवर परतला

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 14 September 2020

अभिनेत्री दीपिका पदूकोण सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटींगसाठी नुकतीच गोव्याला रवाना झाली आहे. तिच्यापाठोपाठ आता पती आणि अभिनेता रणवीर सिंह देखील शूटींगसाठी सज्ज झाला आहे. 

मुंबई- लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्व शूटींग्स बंद होत्या मात्र आता हळूहळू अनलॉकमध्ये सरकारच्या परवानगीने पुन्हा एकदा शूटींगला सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी परदेशात रवाना झाले आहेत तर काहींना देशांतर्गत शूटींगला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदूकोण सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर शूटींगसाठी नुकतीच गोव्याला रवाना झाली आहे. तिच्यापाठोपाठ आता पती आणि अभिनेता रणवीर सिंह देखील शूटींगसाठी सज्ज झाला आहे. 

हे ही वाचा: बापरे या अभिनेत्रीच्या चेह-यावरुन काढले ६७ काचांचे तुकडे

अभिनेता रणवीर सिंहने मुंबईमध्ये एका जाहीरातीचं शूटींग सुरु केलं आहे. या जाहीरातीच्या शूटींगसाठी कित्येक दिवस तयारी सुरु होती. शूटींगमध्ये सहभागी होणा-या प्रत्येक कलाकार आणि टेक्निशिअन्सनी सगळ्या नियमांचं पालन करुन घरातून निघाले. लोकेशनवर शूटींग दरम्यान रणवीरने निळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला असून गॉगल आणि चेह-यावर मास्क देखील होता. सगळ्या लोकांनी या दरम्यान सुरक्षिततेसोबत सोशल डिस्टन्सिंग देखील पाळलं होतं. सेटवर सॅनिटायजरचा वापर केला जात होता. 

Ranveer Singh back to work after 5 months for ad film shooting | Ranveer  Singh returns to the set after 5 months, Ed appeared in the studio in  connection with the shooting

सिनेमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर रणवीर सिंहचे दोन सिनेमे थिएटर उघडण्याची वाट पाहत आहेत. त्यातील एक सिनेमा म्हणजे '८३' ज्यामध्ये रणवीर कपिल देवची भूमिका साकारत आहे आणि दूसरा 'सूर्यवंशी' ज्यामध्ये तो खास सिम्बाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. यासोबतंच यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या 'जयेशभाई जोरदार'ची शूटींग जवळपास पूर्ण झाली आहे. हा सिनेमा सुरुवातील २ ऑक्टोबरला रिलीज करण्याचं ठरवलं होतं मात्र लॉकडाऊनच्या कारणामुळे आता हा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज केला जाईल.   

ranveer singh has come back on shooting after remove lockdown due to coronavirus  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh has come back on shooting after remove lockdown due to coronavirus