प्रतिक्षा संपली; रणवीरच्या '83' ची रिलीज डेट जाहीर

kapil dev.
kapil dev.

मुंबई-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. लॅाकडाऊनच्या काळात अनेक चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्यास पसंती दिली. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी अनेक बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपट रिलीज होणार आहेत. नुकतीच रणवीर सिंगच्या 83 या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर झाली आहे.

4 जून 2021 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर रणवीर सिंगने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्लाळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटगृहांमध्ये भेटू असे कॅप्शन देऊन रणवीरने हे पोस्टर शेअर  केले आहे. या आधी हा चित्रपट 10 एप्रिल 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. 

शशांक केतकरला पुत्ररत्न; फोटो शेअर करून सांगितलं खास नाव

भारतीय संघाने  25 जून 1983 रोजी लॉर्ड्स मैदानावर विश्वचषक जिंकला होता. यावेळी कर्णधार कपिल देव आणि त्यांच्या टीमने हा विश्वचषक जिंकण्यासाठी केलेली मेहनत तसेच त्यांना आलेल्या अडचणी या सर्व गोष्टींवर या चित्रपटाचे कथानक लिहिले गेले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. पंकज त्रिपाठी, रणवीर सिंग,एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम, ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर हे लोकप्रिय कलाकार या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका रणवीरने केली आहे. तसेच दिपीका पादूकोनने कपिल देवच्या पत्नी रोमी यांची भूमिका साकारली आहे. रणवीरच्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com