रणवीरच्या 'सिंबा'ची बॉक्‍स ऑफिसवर डरकाळी

Sakal | Saturday, 29 December 2018

मुंबई : शाहरुख खानचा महत्त्वाकांची 'झिरो' बॉक्‍स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर रणवीरसिंहच्या 'सिंबा'ने वर्षाचा शेवट गोड केला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा'ने पहिल्याच दिवशी 20.72 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली आहे.  शाहरुखच्या 'झिरो'ने भारतामध्ये आतापर्यंत 84.10 कोटी रुपये इतकीच कमाई केली आहे. परदेशातील कामगिरीचाही एकत्रित विचार केला, तर 'झिरो'ने 100 कोटी क्‍लबमध्ये प्रवेश केला आहे; पण समीक्षक आणि रसिकांनी या चित्रपटावर नाराजीच व्यक्त केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रणवीरच्या 'सिंबा'ने अनपेक्षितरित्या चांगली कामगिरी केली. 

मुंबई : शाहरुख खानचा महत्त्वाकांची 'झिरो' बॉक्‍स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर रणवीरसिंहच्या 'सिंबा'ने वर्षाचा शेवट गोड केला आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंबा'ने पहिल्याच दिवशी 20.72 कोटी रुपयांची दणदणीत कमाई केली आहे. 

शाहरुखच्या 'झिरो'ने भारतामध्ये आतापर्यंत 84.10 कोटी रुपये इतकीच कमाई केली आहे. परदेशातील कामगिरीचाही एकत्रित विचार केला, तर 'झिरो'ने 100 कोटी क्‍लबमध्ये प्रवेश केला आहे; पण समीक्षक आणि रसिकांनी या चित्रपटावर नाराजीच व्यक्त केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर रणवीरच्या 'सिंबा'ने अनपेक्षितरित्या चांगली कामगिरी केली. 

रणवीरच्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांमध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून 'सिंबा'ने कामगिरी करून दाखविली आहे. 'सिंबा'खालोखाल रणवीरच्या 'पद्मावत'ने पहिल्या दिवशी 19 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याखालोखाल 'गुंडे' (16.12 कोटी), 'गोलियों की रासलीला रामलीला' (16 कोटी) आणि 'बाजीराव मस्तानी' (12.80 कोटी) या चित्रपटांचा क्रमांक आहे. 

'मसालापट' असलेल्या 'सिंबा'ला समीक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटात रणवीरसह सारा अली खान, सोनू सूद आणि आशुतोष राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.