रणवीर सिंग साकारणार कपिल देव

सोमवार, 25 सप्टेंबर 2017

अलिकडे खूप बायोपिक यायला सुरूवात झाली आहे. अशातच ही वरची बातमी वाचून रणवीर सिंग आता कपिल देव यांच्यावरचा सिनेमा करतोय की काय अशी शंका तुमच्या मनात आली असेल. ती काही प्रमाणात खरी आहे आणि काही प्रमाणात खोटी. म्हणजे रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे, पण हा चित्रपट कपिल यांचा जीवनपट नाही. तर हा चित्रपट बनतो आहे 1983 वरच्या भारताने वर्ल्ड कप जिंकला होता, त्या विषयावर. 

मुंबई : अलिकडे खूप बायोपिक यायला सुरूवात झाली आहे. अशातच ही वरची बातमी वाचून रणवीर सिंग आता कपिल देव यांच्यावरचा सिनेमा करतोय की काय अशी शंका तुमच्या मनात आली असेल. ती काही प्रमाणात खरी आहे आणि काही प्रमाणात खोटी. म्हणजे रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे, पण हा चित्रपट कपिल यांचा जीवनपट नाही. तर हा चित्रपट बनतो आहे 1983 वरच्या भारताने वर्ल्ड कप जिंकला होता, त्या विषयावर. 

गेल्या काही दिवसांपासून या विषयावर चर्चा सुरू होती. काही अफवाही उठल्या होत्या. पण माजी क्रिकेटपटू आणि 1983 वेळी संघात असलेले खेळा़डू कीर्ती आझाद यांनी ट्विट करून ही बातमी सगळ्यांना दिली आणि कपिल देव यांची भूमिका रणवीर करत असल्याच्या बातमीला पुष्टी मिळाली. 83 मध्ये भारताने विजय मिळवला त्यावेळी संघाचे कर्णधार कपिल देव होते. त्यामुळे साहजिकच या सिनेमाचे नायक ते असतील हे ओघाने आलेच. पण त्याचवेळी संघातील इतर खेळाडूंची निवड कशी होणार आहे, त्यांची भूमिका कोण करणार आहे, त्याबाबत अजून फार चर्चा नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत, दिग्दर्शक कबीर खान. 

Web Title: ranveer singh will potrey kapil dev in upcoming movie esakl news