रणवीर आणि रामदेवबाबांची योगासने

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

योगगुरू रामदेवबाबांची लोकप्रियता व त्यांना आदर्श मानणाऱ्यांमध्ये सामान्यांपासून सेलिब्रिटीही आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमातही ते दिसून आले. रणवीर सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होता. "बाजीराव'नंतर अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका तो साकारत आहे. आपल्याला योगगुरू बाबा रामदेव यांचे चरित्र पडद्यावर साकारायला आवडेल, असे त्याने सांगितले. या कार्यक्रमात बाबा रामदेव आल्याचे पाहताच त्यांना नृत्य करण्याचे आमंत्रण रणवीरने दिले. साहजिकच बाबांनी त्याला नम्रपणे नकार दिला; पण योगातील काही आसने करण्याची तयारी दाखविली.

योगगुरू रामदेवबाबांची लोकप्रियता व त्यांना आदर्श मानणाऱ्यांमध्ये सामान्यांपासून सेलिब्रिटीही आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमातही ते दिसून आले. रणवीर सिंग या कार्यक्रमाला उपस्थित होता. "बाजीराव'नंतर अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका तो साकारत आहे. आपल्याला योगगुरू बाबा रामदेव यांचे चरित्र पडद्यावर साकारायला आवडेल, असे त्याने सांगितले. या कार्यक्रमात बाबा रामदेव आल्याचे पाहताच त्यांना नृत्य करण्याचे आमंत्रण रणवीरने दिले. साहजिकच बाबांनी त्याला नम्रपणे नकार दिला; पण योगातील काही आसने करण्याची तयारी दाखविली. त्यावर रणवीरही पुढे झाला आणि त्या दोघांनी "बाजीराव मस्तानी'मधील "मल्हारी' गाण्यावर योगासने केली. त्यानंतर रामदेवबाबांशी बोलताना रणवीर गमतीने म्हणाला, की बाबा तुमच्या जीवनावर आधारित चित्रपट निघाला, तर त्यात मला तुमची भूमिका करायला आवडेल.
 

Web Title: Ranvir and Ramdev yoga

टॅग्स