पोलिसांनी अभिनेता रणवीर शौरीची ८ तासांनंतर सोडली गाडी, म्हणाले गरोदर महिलेची प्रसुती इमर्जन्सी नाही..

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

अभिनेता रणवीर शौरेसोबत विचित्र वागणुक झाली आहे इतकंच नाही तर त्याची कार सुद्धा जप्त केली गेली आहे. रणवीर शौरेने ट्वीट करत याबाबतचा खुलासा केला आहे.

मुंबई- कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगात तणावाचं वातावरण आहे. लॉकडाऊन सुरु असल्याने घराबाहेर पडायलाही परवानगी नाहीये. जर तुम्हाला महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचं असेल तर त्यासाठी अत्यावश्यक सेवेचा पास असणं बंधनकारक आहे. मुंबई पोलिस याबाबत अत्यंत कठोर वागताना दिसून येत आहेत याचा अंदाज तुम्ही अभिनेता रणवीर शौरेच्या प्रकरणातून लावू शकता.

हे ही वाचा: दीपिका पदूकोण सुरुवातीच्या काळात रोज 'या' अभिनेत्याच्या फोटोला किस करुन झोपायची

अभिनेता रणवीर शौरेसोबत विचित्र वागणुक झाली आहे इतकंच नाही तर त्याची कार सुद्धा जप्त केली गेली आहे. रणवीर शौरेने ट्वीट करत याबाबतचा खुलासा केला आहे. रणवीरने लिहिलंय, मुंबई पोलिस माझ्या विरोधात तक्रार दाखल करत प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या पोलिस अधिका-याने त्यांची कार थांबवली त्याचं म्हणणं आहे की गरोदर महिलेची प्रसुती अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाही.

त्याने ट्वीट करत लिहिलंय, 'माझी कार पोलिसांनी जप्त केली आहे, जी गाडी माझ्या नोकर त्याच्या पत्नीच्या प्रसुतीसाठी घेऊन गेला होता. पोलिस अधिका-याचं म्हणणं आहे की महिलेची प्रसुती अत्यावश्यक सेवांमध्ये नाही. कृपया सल्ला द्या.'रणवीरने एकानंतर एक अनेक ट्वीट्स केले करत सांगितलं आहे की जवळपास ८ तासांपेक्षा जास्त त्यांना पोलिस स्टेशनमध्ये बसवलं होतं.

रणवीरने त्याच्या ट्वीटमध्ये सांगितलं की त्या पोलिस अधिका-याचं म्हणणं होतं की नोकरची पत्नी आणि डॉक्टर यांनी हे प्रकरणं स्वतः निभवून घेतलं असतं ज्यावर त्याला उत्तर देताना मी म्हटलं की हॉस्पिटल वडिलांशिवाय कागद पत्रांच्या व्यवहारासाठी तयार नव्हतं. इतकंच नाही तर रणवीरने म्हटलंय की पोलिस त्यांची कोणतीही बाजु ऐकुन घेण्यासाठी तयार नव्हते. पोलिसांनी ड्रायव्हरच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. आणि त्याची गाडी जप्त केली आहे. 

शेवटच्या ट्वीटमध्ये रणवीरने लिहिलंय, '८ तासांपेक्षा जास्तवेळ मी पोलिस स्टेशनमध्ये बसून होतो. त्यानंतर आम्हाला कोणतीही एफआयआर दाखल न करता आणि कार जप्त न करता सोडलं. उशीरा का होईना माझं ऐकलंत त्यासाठी धन्यवाद. मी माझे ८ तास वाया घालवले आणि माझा तुमच्यावर असलेला विश्वास देखील.'  

ranvir shorey car was impounded by the mumbai police which was given household help for his wife delivery  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranvir shorey car was impounded by the mumbai police which was given household help for his wife delivery