PM मोदी की राहुल गांधी ? पोल घेऊन फसला रणवीर शौरी

स्वाती वेमूल
Thursday, 18 February 2021

वाचा काय आहे नेमकं प्रकरण?
 

अभिनेता रणवीर शौरी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. यामागचं कारण आहे सोशळ मीडियावर व्हायरल झालेला एक फोटो. हा फोटो व्हॉट्स अॅप चॅटचा स्क्रीनशॉट असून त्यामध्ये रणवीर शौरीच्या नावाने चॅट केला जात आहे. भाजपच्या आयटी सेलच्या नावाने बनवलेल्या ग्रुपमध्ये हा चॅट केला जात आहे. व्हायरल झालेल्या या स्क्रिनशॉटमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्याशी निगडीत पोलवर चर्चा होतेय. मात्र रणवीरने हा स्क्रिनशॉट बनावट असल्याचं सांगत मुंबई पोलीस आणि सायबर क्राइमकडे तक्रार दाखल केली आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?
रणवीर शौरीने १६ फेब्रुवारी रोजी ट्विटर अकाऊंटवर एक पोल पोस्ट केला होता. 'जर तुमच्याकडे फक्त दोनच पर्याय असतील, रागा (राहुल गांधी) आणि नमो (नरेंद्र मोदी) तर तुम्ही कोणाला निवडाल?' असं त्या पोलमध्ये लिहिलं होतं. रणवीरच्या या पोलला दोन लाख ८८ हजारांहून अधिक मतं मिळाली. यामध्ये ५९ टक्के राहुल गांधी यांना तर ४१ टक्के नरेंद्र मोदींना मत मिळाली. रणवीरच्या नावाने जो व्हॉट्स अॅप चॅट व्हायरल होतोय, त्यात याच पोलचा उल्लेख केला गेलाय. यामध्ये रणवीरच्या नावाने सेव्ह केलेला नंबर व त्याचा फोटोसुद्धा दिसतोय. याच ग्रुपमध्ये रणवीरच्या नावाने मेसेज लिहिले गेले आहेत. 

'पोलमध्ये आपला पराभव होतोय. याला आणखी पसरवा आणि प्रत्येक मताला मोजून घ्या. दुसऱ्या पर्यायाला (नमो) मत द्या. मित्रांनो, पोलमधली मतं कमी पडतायत. तुमचा आयटी सेल कुठे आहे? मला असं वाटतंय की मला हा पोल डिलिट करावा लागेल', असे चॅट रणवीरच्या नावाने केलेले आहेत. यानंतर भाजप एसपी मीडिया गुजरातच्या नावाने सेव्ह केलेल्या नंबरवरून रिप्लाय येतो. 'घाबरू नका सर, आम्ही यावर काम करतोय', असा हा रिप्लाय आहे. 

May be an image of text

रणवीरने केली तक्रार
व्हॉट्स अॅप चॅटचा स्क्रिनशॉट जेव्हा व्हायरल होऊ लागला आणि त्यात रणवीरला टॅग केलं जाऊ लागलं, तेव्हा त्याने मुंबई पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार केली. 'मुंबई पोलीस, हा अटॅच केलेला ट्विट फेक आहे. माझ्या नावाने यात चॅट केलं जातं. पण ते खोटं आहे', असं त्याने लिहिलं. रणवीरच्या या ट्विटवर महाराष्ट्र सायबर सेलकडून उत्तर देण्यात आलं. 'धन्यवाद, आमच्याकडे येण्यासाठी. आम्ही आमच्या टीमला याबद्दलची माहिती दिली आहे. तपासानंतर यावर कारवाई केली जाईल', असं आश्वासन त्यांनी रणवीरला दिलं. 

या संपूर्ण प्रकरणानंतर रणवीरने आणखी एक ट्विट करत लिहिलं, 'यावरून आपल्याला काँग्रेसच्या कामाची पद्धत दिसून येतेय. मी कोणा दुसऱ्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये असल्याचं या फेक फोटोद्वारे दाखवून दिलं जातंय.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranvir shorey in controversy after tweeting poll about rahul gandhi and narendra modi