रॅप बादशाह गाणार 'हम्मा हम्मा' रिमिक्स

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

'बॉंबे' चित्रपटातील संगीत आजही श्रवणीय वाटते. ए. आर. रेहमान यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेऊन त्यांना ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या 'हम्मा हम्मा' या गाण्याची पुनर्निमिती करून करण जोहरने रेहमान यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला आहे. करणने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. 

ए. आर. रेहमानचे प्रत्येक गाण्यातील वेगळेपण त्यात जाणवते. रेहमानची गाणीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्यांची दखल घेऊन ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. 
'हम्मा-हम्मा' गाणे 'ओके जानू'मध्ये रॅप गायक बादशाहने गायले आहे. त्यातून त्याने रेहमानला मानवंदना दिली आहे. श्रद्धा व आदित्य रॉय कपूरची पावले या गाण्यावर थिरकली आहेत. हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
Web Title: rap singer badshah to sing hamma hamma