नम्र राहायला आवडते (अक्षया देवधर )

शब्दांकन - तन्मयी मेहेंदळे
मंगळवार, 25 एप्रिल 2017

रॅपिड फायर 
दिवसाची सुरवात कशी करतेस? 
- "विथ अ कप ऑफ कॉफी'! 

आवडते पेय कोणते? 
- चहा आणि कॉफीचे वेगवेगळे प्रकार मला खूप आवडतात. 

तुझा फिटनेस फंडा काय? 
- आई-बाबा दोघंही क्रीडा क्षेत्रात असल्यानं मी खो-खो, जिम्नॅस्टिक आणि ऍथलेटिक्‍स खेळायचे. खेळ हाच सर्वांत उत्तम व्यायाम आहे, असं मला वाटतं. 

रॅपिड फायर 
दिवसाची सुरवात कशी करतेस? 
- "विथ अ कप ऑफ कॉफी'! 

आवडते पेय कोणते? 
- चहा आणि कॉफीचे वेगवेगळे प्रकार मला खूप आवडतात. 

तुझा फिटनेस फंडा काय? 
- आई-बाबा दोघंही क्रीडा क्षेत्रात असल्यानं मी खो-खो, जिम्नॅस्टिक आणि ऍथलेटिक्‍स खेळायचे. खेळ हाच सर्वांत उत्तम व्यायाम आहे, असं मला वाटतं. 

तुझा आवडता रंग कोणता आहे? 
- निळा रंग मला प्रचंड आवडतो. 

तुझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट? 
- "तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील "अंजली पाठक' ही भूमिका माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट वाटते. 

रिकाम्या वेळात काय करतेस? 
- मला भरपूर फिरायला आणि अनेक ठिकाणचे पदार्थ टेस्ट करायला आवडतं. 

शाळेतील एखादी आठवण? 
- मी अहिल्यादेवी शाळेत होते. एकदा नाटकात झाशीच्या राणीच्या वडिलांच्या, पुरुष भूमिकेसाठी मला दुसरा क्रमांक मिळाला होता. ती आठवण कायम लक्षात राहील. 

अभिनेत्री झाली नसतीस, तर काय व्हायला आवडलं असतं? 
- अर्थातच खेळाडू झाले असते! 

तुझ्यासाठी सर्वांत आनंदाचा क्षण? 
- कामातून मिळालेले समाधान हाच आनंदाचा क्षण असतो. 

"अंजलीबाई' आणि "अक्षया' या दोघींचा स्वभाव नेमका कसा आहे? 
- "अंजली' या मी साकारत असलेली व्यक्तिरेखेप्रमाणेच खऱ्या आयुष्यातही मला साधे आणि नम्र राहायला आवडते. 

Web Title: Rapid fire round akshaya deodhar