
- 'बिग बॉस'च्या घरात 'विकेंड वॉर' होण्याची शक्यता
नवी दिल्ली : 'बिग बॉस' 13 सीजनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता या आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात 'विकेंड वॉर' होण्याची शक्यता आहे. बिग बॉसच्या घरातून मधुरिमा तुली, विशाल आदित्य सिंह, अरहान खान, सिद्धार्थ शुक्ला, शेफाली बग्गा आणि आरती सिंह नॉमिनेट झाले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
त्यानंतर आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून फक्त एकच स्पर्धक नॉमिनेट होणार आहे. तसेच बिग बॉस (Bigg Boss) फॅन पेजच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली, की या आठवड्यात बिग बॉसमध्ये रश्मी देसाई आणि अरहान खान ही प्रसिद्ध जोडी तुटण्याची शक्यता आहे.
Photo : शेवंता आणि अण्णा गोव्यात करताहेत रोमान्स!
विकेंड वॉरमध्ये अरहान खान घरातून बाहेर होणार आहेत. याबाबतची माहिती बिग बॉसच्या सूत्रांनी इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरून दिली आहे. या पोस्टवरून अनेकजण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. तसेच मागील आठवड्यात सलमान खान (Salman Khan) याने रश्मी देसाई (Rashami Desai) समोर अरहान खानच्या सर्व गोष्टी उघड केल्या होत्या. त्यानंतर या दोघांमध्ये मोठी भांडणंही झाली होती. मात्र, काही काळानंतर ते दोघे पुन्हा एकत्र आले आहेत.
बिग बॉसमध्ये या आठवड्यात शहनाज गिल (Shehnaaz Gill) कॅप्टन झाला. शहनाज गिलला कॅप्टन केले तरीदेखील घरातील कोणत्याही सदस्याने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
रोहित शेट्टीची एंट्री
या विकेंड वॉरमध्ये रोहित शेट्टी याने बिग बॉसच्या घरात एंट्री केली होती आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे चांगलेच मनोरंजन केले.