'मुंबई,पुणं नाही साऊथच्या रश्मिकाला खुणावतंय महाराष्ट्रातलं कोल्हापूर..', म्हणाली..Rashmika Mandanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandanna

Rashmika Mandana: 'मुंबई,पुणं नाही साऊथच्या रश्मिकाला खुणावतंय महाराष्ट्रातलं कोल्हापूर..', म्हणाली..

Rashmika Mandanna:नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आता केवळ साऊथमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही भलतीच सक्रिय झालीय असं म्हणत असताना पठ्ठीनं मराठी इंडस्ट्रीचा मंचही गाजवला.मराठी लावणीवर ठुमके लगावताना रश्मिकानं सगळ्यांचेच मन जिंकले..

बरं याच कार्यक्रमातील आता आणखी एक रश्मिकाचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात तिनं कोल्हापूरला जायला आवडेल असं म्हटलंय...आता समस्त कोल्हापूरकर यामुळे सुखावले तर नवल नको. कारण मुंबई,पुण्यासारख्या शहरांना सोडून रश्मिकानं थेट कोल्हापूरकडे आपला मोर्चा वळवला आहे. चला कोल्हापूरविषयी काय म्हणालीय रश्मिका ते पाहूया,

झी मराठीच्या त्या पुरस्कार सोहळ्यात रश्मिकाला डॉ.निलेश साबळेनी तिला म्हटलं की आता थोडं मराठीत गप्पा मारुया. तेव्हा साऊथ स्टार रश्मिका लगेच हो म्हणाली.

तेव्हा पुढे निलेशनी विचारलं,'तुम्हाला कोल्हापुरला यायला आवडेल का?' तेव्हा रश्मिका लगेच गोड हसत म्हणाली,'चालतंय की....' वा..रश्मिकाच्या या 'चालतंय की' नं समस्त कोल्हापूरचं मन जिंकलं असणार एवढं नक्की.

या पुरस्कार सोहळ्यात मराठी लावणीच नाही तर मराठी भाषेत बोलण्याचा रश्मिकाचा उत्साहही सगळ्यांना भलताच आवडला आहे.

साऊथची सुपरस्टार रश्मिका मंदाना आता बॉलीवूडमध्येही एकापाठोपाठ एक सिनेमे करताना दिसतेय. सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा 'मिशन मजनू', अमिताभ बच्चन सोबतचा 'गूडबाय' हे तिचे दोन सिनेमे आपल्या भेटीला आले आहेत. तर लवकरच रणबीर कपूरसोबतच्या 'अॅनिमल' सिनेमातही ती आपल्याला दिसणार आहे. आता बॉलीवूडनंतर रश्मिका एखाद्या मराठी सिनेमात ठसकेबाज लावणी करताना दिसली तर नवल नव्हे.