Rashmika Mandanna चा मराठीत 'नमस्कार मंडळी..' म्हणत व्हिडीओ व्हायरल..मराठी लावणीवर बोलताना दिसतेय श्रीवल्ली...Rashmika Mandanna | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika Mandanna

Rashmika Mandanna चा मराठीत 'नमस्कार मंडळी..' म्हणत व्हिडीओ व्हायरल..मराठी लावणीवर बोलताना दिसतेय श्रीवल्ली..

Rashmika Mandanna: मनोरंजनविश्वाला भाषेचं बंधन कधी नव्हतं आणि कधी नसेलही....अनेक वर्षापासून आपण पाहत आलोय की काही बॉलीवूडकर मराठीत आपली झलक दाखवून गेलेयत तर काही मराठी कलाकारांनी हिंदी सिनेमातून आपल्या आभिनयाची चुणूक दाखवली आहे.

आता तर बॉलीवूडकर साऊथमध्येही मोठ्या प्रमाणात काम करत आहेत...साऊथचे सिनेमे हिंदीत आवर्जून डब करून मोठ्या प्रमाणात रिलीज केले जात आहेत. अनेक साऊथ स्टार्सनी बॉलीवूडचा रस्ता पकडला आहे.

यात विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना,पूजा हेगडे अशी नावं घेता येतील. आता रश्मिकाचं नाव घेतलंच आहे तर तिच्या मराठीती एन्ट्रीविषयी एक बातमी समोर आलीय त्याविषयी जाणून घेऊया नेमकं काय करतेय ही नॅशनल क्रश मराठीत?(Rashmika Mandanna tollywood actress marathi lavni zee chitra gaurav puraskar 2023)

सोशल मीडियावर रश्मिकाचा एक प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्यात ती चक्क मराठीत 'नमस्कार मंडळी' म्हणत लोकांना आपण मराठी लावणीवर ठुमके लगावताना दिसणार आहोत असं काहीसं सांगतेय.

आता रश्मिका आणि मराठीत..त्यातही मराठी मनाचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या लावणीवर ती ठुमके लगावणार म्हटल्यावर तर काय चर्चा रंगलीच पाहिजे नाही का.

तर रश्मिका मंदाना लवकरच आपल्याला यंदाच्या 'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात' दिसणार आहे. तिनं स्वतः पोस्ट करत थोडं फार जमेल तसं मराठीत बोलत आपल्या चाहत्यांना याची बातमी दिली आहे.

त्यामुळे आता सगळेच झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या मानाच्या 'झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याची' वाट पाहत्यात हे मात्र नक्की.

हेही वाचा: तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना साऊथमध्ये बडी स्टार आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'पुष्पा' सिनेमातील तिच्या श्रीवल्ली भूमिकेमुळे तर तिची हिंदी-मराठी प्रेक्षकांतही क्रेझ वाढली आहे. आता तर तिनं बॉलीवूडमध्येही पदार्पण केलं आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा 'गूडबा'य सिनेमा आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या 'मिशन मजनू' मधनं रश्मिकानं काम केलं आहे. सिनेमांना फार काही चांगला प्रतिसाद थिएटर आणि ओटीटीवरही मिळालेला नसला तरी रश्मिकाची दखल मात्र घेतली गेली हे निश्चित.

आता बॉलीवूडनंतर मॅडम मराठीत मिसळू लागल्यात तेव्हा पुढे जाऊन एखाद्या बिग बॅनर मराठी सिनेमात रश्मिकाचं एखादं फक्क्ड गाणं पहायला मिळालं तर नवल नव्हे.

असो,सध्या तरी तिच्या चाहत्यांना वेध लागलेत ते झी मराठीच्या चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात मराठी लावणीवर ठुमका लगावताना रश्मिका काय धमाल आणतेय याचे. सो वॅट अॅन्ड वॉच...