रसिका दुग्गल "मंटो' चित्रपटात 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

नंदिता दास दिग्दर्शित "मंटो' चित्रपटात रसिका दुग्गल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारित आहे.

मंटो यांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी साकारणार आहे. त्यांची पत्नी साफिया यांच्या भूमिकेत रसिका दिसेल. चित्रपटातील तिचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. हा लूक प्रेक्षकांना भावला आहे. नवाजुद्दीनच्या लूकलाही प्रेक्षकांची दाद मिळाली होती. मंटो यांची भूमिका साकारायला मिळाल्यामुळे नवाजुद्दीन खूश आहे. तो म्हणाला, "नंदिता दास यांनी मंटो यांचा खूप अभ्यास केला आहे. त्यामुळे ही भूमिका साकारायला मला खूप मदत झाली'. 

Web Title: rasika dugal in monto