Photo : शेवंता आणि अण्णा गोव्यात करताहेत रोमान्स!

टीम ई-सकाळ
Sunday, 29 December 2019

'रात्रीस खेळ चाले-2' या मालिकेमुळे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्रं लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या परिचयाची झाली. या मालिकेचा आगामी भाग हा रोमान्सने भरलेला असणार आहे.

'झी मराठी' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले-2' ही आधीच्या भागाइतकीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image may contain: 1 person, smiling

या मालिकेमुळे अण्णा नाईक आणि शेवंता ही पात्रं लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांच्या परिचयाची झाली. या मालिकेचा आगामी भाग हा रोमान्सने भरलेला असणार आहे. कारण अण्णा आणि शेवंता हे गोव्याला फिरायला गेले आहेत.

गोव्यामधील एका बीचवर ते 'गोवा सफारी'चा आनंद घेताना दिसत आहेत. शेवंताने पिवळ्या रंगाची शिफॉन साडी घातली आहे. तर अण्णांनी गुलाबी रंगाचा शर्ट आणि धोतर घातलेलं दिसत आहे. 

Image may contain: one or more people, people standing, ocean, sky and outdoor

एका सीनमध्ये शेवंता किल्ला बनवताना दिसत आहे. तर आणखी एका सीनमध्ये तिने शहाळं घेतलेलं आहे.

Image may contain: 3 people, people standing

दरम्यान, अण्णांच्या कचाट्यातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी शेवंता धडपड करत असते. शेवटी माधवसोबत ती मुंबईला जायलादेखील राजी होते.

Image may contain: 2 people, people standing, ocean and outdoor

पण, अण्णांना जेव्हा हे कळतं तेव्हा ते आपल्या युक्तीने बाजी पलवतात. आणि शेवंताची मनधरणी करून तिला मुंबईला जाण्यापासून रोखतात. 

मात्र, मुंबईला जायचं रद्द झाल्यानंतरही शेवंता एका वेगळ्याच विचारात गढून गेली आहे. पुढील भागात एका मंदिरात तर ती तिच्या चुकीची कबूली देताना दिसत आहे.

Image may contain: 1 person, smiling, standing, ocean and outdoor

'आपल्या एका चुकीमुळे सुरू झालेला हा प्रवास आता संपतोय, त्यासाठी मला शक्ती दे,' असं मागणं शेवंता देवाकडे मागत आहे. त्यामुळं या गोव्याच्या ट्रीपमध्ये काहीतरी वेगळं घडणार की यामध्येही ट्विस्ट येणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

गोवा सफरीचा हा एक तासाचा हा विशेष भाग मंगळवारी (ता.31) रात्री 10.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.

Image may contain: one or more people, people sitting, sky and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratris Khel Chale 2 Anna and Shevanta are seen romancing on the beach in Goa