'रात्रीस खेळ चाले ३'मधील दोन लोकप्रिय अभिनेत्रींची सोशल मीडियावर चर्चा

purniemaa dey and apurva nemlekar
purniemaa dey and apurva nemlekar

'रात्रीस खेळ चाले ३' ही गूढ आणि रहस्यपूर्ण कथानक असलेली मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ही पुन्हा एकदा शेवंताच्या भूमिकेत झळकणार आहे. तिच्यासोबतच आणखी एक अभिनेत्री यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. सध्या या दोन अभिनेत्रींनी सोशल मीडियावर चर्चा आहे. मालिकेत दिसणारी दुसरी अभिनेत्री पूर्णिमा डे असून तिचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. पूर्णिमाने याआधी 'तुला पाहते रे' या मालिकेत भूमिका साकारली होती. आता 'रात्रीस खेळ चाले ३'मध्येही ती नकारात्मक भूमिकेत झळकणार आहे. या प्रोमोमध्ये तिच्या भूमिकेची झलक पाहायला मिळते. 

पौर्णिमा माईंकडून बळजबरीने वाडा मिळवायचा प्रयत्न करते. इतक्यात माईंचा मुलगा अभिराम तिथे येतो. पौर्णिमाने तिच्या इन्स्टाग्रामवर हा प्रोमो शेअर केला असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 'पुन्हा येत आहे तुम्हा सर्वांच्या भेटीस. एका नव्या रुपात, एका नव्या भूमिकेत, 'रात्रीस खेळ चाले ३ ' या लोकप्रिय मालिकेतून', असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. दुसरीकडे अपूर्वाच्या भूमिकेचीही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जिथे अण्णा नाईक असणार, तिथे शेवंता नक्कीच असेल, असं म्हणत अपूर्वाने तिच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला होता. त्यामुळे आता पौर्णिमा आणि अपूर्वा या दोन अभिनेत्रींमुळे मालिकेच्या कथानकात रंगतदार वळण येणार, यात काही शंका नाही.

लेखकाच्या नजरेतून 'रात्रीस खेळ चाले ३'
'अण्णा नाईकांच्या पापामुळे त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला अत्रुप्त आत्म्यांनी दिलेले शाप भोगावे लागले. अण्णा नाईकांच्या पुढच्या पिढीची वाताहात झाली. अत्रुप्त आत्म्यांनी नाईक वाड्याचा ताबा घेतला. एक नांदतं घर बघता बघता रसातळाला गेलं. पण या आलेल्या वादळात अण्णा नाईकांची बायको इंदू उर्फ माई नाईक घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या संकंटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्रीसुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते, त्याची ही एक रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाईक घराण्याचं पाप, शाप आणि उ:शाप यामधून झालेलं संक्रमण म्हणजेच रात्रीस खेळ चाले भाग १,२ आणि ३ असं म्हणता येईल,' असं लेखक राजेंद्र घाग कथेविषयी म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com