अन्‌ रविनाची उडाली झोप... 

वृत्तसंस्था
मंगळवार, 24 जानेवारी 2017

कधी कधी जीवनात असे काही कटू अनुभव येतात, जे आपल्या मनावर खोलवर परिणाम करून जातात. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री रविना टंडनला आला. ती सध्या आगामी चित्रपट "द मदर'चे चित्रीकरण करते आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असे काहीतरी घडले की, ती तीन दिवस झोपू शकली नाही. "द मदर' चित्रपटाची कथा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित असून यात रविना एका आईची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती त्या पात्रात पूर्णपणे समरसून गेली आणि चित्रीकरण संपल्यानंतरही ती त्या पात्रातून बाहेर पडू शकली नाही. तिला नॉर्मल व्हायला खूप वेळ लागला.

कधी कधी जीवनात असे काही कटू अनुभव येतात, जे आपल्या मनावर खोलवर परिणाम करून जातात. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री रविना टंडनला आला. ती सध्या आगामी चित्रपट "द मदर'चे चित्रीकरण करते आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान असे काहीतरी घडले की, ती तीन दिवस झोपू शकली नाही. "द मदर' चित्रपटाची कथा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आधारित असून यात रविना एका आईची भूमिका साकारत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ती त्या पात्रात पूर्णपणे समरसून गेली आणि चित्रीकरण संपल्यानंतरही ती त्या पात्रातून बाहेर पडू शकली नाही. तिला नॉर्मल व्हायला खूप वेळ लागला. याबद्दल रविना म्हणाली की, या चित्रपटाच्या एका भयावह सीक्वेन्सच्या चित्रीकरणाने तीन दिवस मी झोपूच शकले नाही. त्या वेळी माझी मनस्थिती इतकी बिघडली होती, की मला तो सीक्वेन्स डब करावा लागला. डबिंगनंतरही मी बराच वेळ मी रडत होते. मला नॉर्मल व्हायवा खूप वेळ लागला. 

Web Title: raveena tandon