'बायको असावी तर रविनासारखी!' तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्याचं भान सुटलं| Raveena Tandon Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raveena Tandon viral video

Raveena Tandon : 'बायको असावी तर रविनासारखी!' तो व्हिडिओ पाहून नेटकऱ्याचं भान सुटलं

Raveena Tondon bollywood actress share video social media : बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडन ही सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. रविनाला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ या अभिनेत्रीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. आता तिच्या एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

रविनाला लाईमलाईटमध्ये राहणं आवडतं. त्यामुळेच की काय ती वेगवेगळ्या प्रकारे मीम्स व्हायरल करुन चाहत्यांना आकर्षित केलं आहे. आता तिचा एक व्हिडिओ नेटकऱ्यांना कमालीचा भावला आहे. त्यामध्ये ती म्हणते, आता नवऱ्याचे काही खरं नाही. तो कुठे गेला, कुणासोबत गेला हे सारं माहिती आहे. मी आता त्याला फोन लावते. रविनाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

तो व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना हसू आवरलेलं नाही. त्यांनी रविनाचा तो व्हिडिओ पाहून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, बायको असावी तर अशी, नवऱ्याला जर एखादी पत्नी एवढ्या धाकात ठेवत असेल तर मग सगळ्यांना अशीच बायको मिळायला पाहिजे. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. काही दिवसांपासून रविना फनी व्हिडिओ शेयर करत आहे.

हेही वाचा: Viral Video : बुलेटवर बसून तरूणी करतेय पेट्रोलची नशा अन् क्षणात खाली...

रविनानं वयाची पन्नाशी पार केल्यानंतर देखील तिच्या सौंदर्यावर चाहते लट्टु आहेत. तिच्या फोटोंना मिळणाऱ्या प्रतिक्रियाही चर्चेचा विषय होताना दिसत आहे. त्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. आतापर्यत हजारो व्ह्युज त्याला मिळाले आहेत.