रवी किशनची मुलगी बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 January 2019

तयारीनंतर रीवा बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. मार्च पासून चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे.

बॉलिवूडला रीवा किशन च्या रुपाने लवकरच एक नवा चेहरा मिळणार आहे. भोजपुरी अभिनेता रवी किशन याची रीवा मुलगी आहे. बॉलिवूड डेब्यूसाठी ती सज्ज झाली आहे. 

करण कश्यप दिग्दर्शित 'सब कुशल मंगल' या चित्रपटातून रीवा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रीवाने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे. अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या प्ले ग्रुपसोबत तिने एक वर्षे घालवले. अमेरिकेतील अ‍ॅक्टिंग स्कूलमध्येही तिने अभिनयाचे धडे गिरवले. इतक्या तयारीनंतर रीवा बॉलिवूडसाठी सज्ज झाली आहे. मार्च पासून चित्रपटाचे शूटींग सुरु झाले आहे. 
 

बॉलिवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे व निर्माता प्रदीप शर्मा यांचा मुलगा प्रियांक शर्मा हा सुद्धा या चित्रपटातून डेब्यू करत आहे. म्हणजेच रीवा व प्रियांक दोघांचाही हा डेब्यू सिनेमा असणार आहे. अभिनेता अक्षय खन्ना या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Kishans daughter Riva is ready to make her Bollywood debut