सैफआधी अमृता सिंहचा 'या' क्रिकेटरशी झाला होता साखरपुडा !

वृत्तसंस्था
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

अमृता आणि सैफच्या नात्याविषयी सर्वांनाच माहित आहे.पण, एकेकाळी अमृता भारतीय क्रिकेटरला डेट करत होती. जाणून घ्या अमृताच्या लव्हलाइफ व सैफसोबतच्या तिच्या नात्याविषयी !

मुंबई : सैफ अली खानची पहिली बायको, सारा अली खानची आई आणि बॉलिवूडची अभिनेत्री अमृता सिंह हिचा आज वाढदिवस आहे. अमृताची ओळख जरी सैफची एक्स बायको अशी असली तरी ती बॉलिवूडची एक उत्तम अभिनेत्री आहे. सकाळ टीमकडून तिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ! अमृता आणि सैफच्या नात्याविषयी सर्वांनाच माहित आहे.पण, एकेकाळी अमृता भारतीय क्रिकेटरला डेट करत होती. जाणून घ्या अमृताच्या लव्हलाइफ व सैफसोबतच्या तिच्या नात्याविषयी !

तैमुरही फॉलो करणार का इंग्लंडला जाण्याची परंपरा ?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mirror mirror- are you mommy or a reflection?The only difference between us- is I always want her attention  She on the other hand is full of love, hugs and affection  And undivided time and energy I sometimes forget to mention  My anchor, my inspiration, the magician that takes away all tensionShe has cures for mood swings, hair-fall, dry skin and water retention  Her versatility, commitment, patience, and selflessness is beyond my comprehension With her around no sadness lasts, no fear persists there can’t be much apprehension- Basically without contention, no need to even mention, mommy is best in every dimension. #amritakibeti #sarakishayari #gotitfrommymama #likemotherlikedaughter #mommyno1

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

अमृताचं नाव जोडलं गेलं होतं 'या' क्रिकेटरशी 
बॉलिवूड आणि क्रिकेट यांच्यातील नातं नेहमीच जवळचं राहिलं आहे. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर यांच्यामध्ये अऩेक प्रेमकथा घडल्या. शर्मिला टागोर आणि मंसूर खान पतौडी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आणि अशी अनेक उदाहरणे आहेत. अमृता सिंहचं नावही रवी शास्त्री यांच्याशी जोडलं गेलं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी यांच्यामध्ये अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. 80च्या दशकात त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरुच होत्या. पण, लोकांच्या नजरेत तेव्हा आलं जेव्हा रवी शास्त्री आणि अमृता सिंग यांनी एका मॅगेझिनच्या कव्हर पेजसाठी एकत्र पोस दिली. 

Image may contain: 2 people, people sitting and beard

या फोटोशुटने त्यांनी नात्याला अधिकृतपणे मान्य केलं. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, अफेअर लपवण्याचा बराच प्रयत्न केला पण, 1986 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. पण, या साखरपुड्याचं लग्नामध्ये रुपांतर झालं नाही. रवी शास्त्री म्हणाले होते की, मला अभिनेत्री पत्नी नको आहे. घर हे तिचं प्राधान्य असलं पाहिजे.''. याला प्रतिक्रिया देताना अमृता म्हणाली होती, ''या घडीला मी माझ्या करीअमध्ये व्यस्त आहे आणि ते सोडू शकत नाही. पण, मला विश्वास आहे काही वर्षांनी मी पूर्णवेळ आई आणि गृहस्थी होऊ शकते.''

Image may contain: 4 people, people standing

ही लव्हस्टोरी फार काळ टिकू शकली नाही. 1990 मध्ये रवी यांनी रितू सिंगशी विवाह केला तर, अमृताने 1991 मध्ये सैफ अली खानशी लग्न केलं. 

नेहा-आदित्यच्या लग्नाची तयारी सुरु अन्, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट व्हायरल !

Image may contain: 2 people, flower

सैफ आणि अमृताची नातं  
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचे 1991 साली लग्न झालं होतं. त्यावेळी सैफ 20 वर्षांचा होता तर अमृता त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी म्हणजे 32 वर्षांची होती. दोघांचे लग्न 12 वर्षे टिकलं. काही कारणास्तव 2004 साली दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोट घेतल्यानंतर 8 वर्षांनी सैफ अली खानने अभिनेत्री करीना कपूरसोबत दुसरं लग्न केलं होतं. 

Image may contain: 3 people, people standing and outdoor

Image may contain: 5 people, people standing and night


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravi Shastri got engaged to Amrita Singh but did not marry her