Just Neel things: इंस्टा ते थेट 70 एमएमचा पडदा.. रील स्टार नीलचे अभिनयात पदार्पण.. पोस्ट करत म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

neel salekar, just neel things, kalavati movie news, just neel things reel video

Just Neel things: इंस्टा ते थेट 70 एमएमचा पडदा.. रील स्टार नीलचे अभिनयात पदार्पण.. पोस्ट करत म्हणाला..

Reel Star Just Neel Things News: Just Neel Things फेम निल सालेकर त्याच्या हटके आणि कॉमेडी reels मुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. निल आजवर अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत Reel व्हिडिओ शूट करताना दिसला.

Just Neel Things आता मोबाईलच्या reel वरून ७० एमएम चा पडदा व्यापणार आहे. कारण सुद्धा खास आहे. नीलला पहिला मराठी सिनेमा मिळाला आहे.

(reel star just neel things aka neel salekar got his first marathi movie)

निलने सोशल मीडियावर एअरपोर्ट बाहेरचा फोटो शेयर केलाय. यात निलच्या हातात बॅग असून सामान दिसतंय. या फोटोखाली निल म्हणतो, "माझ्या पहिल्या मराठी सिनेमासाठी लंडनला निघालोय.

पोटात खड्डा पडलाय पण हृदयात आत्मविश्वास आहे . मला शुभेच्छा द्या, फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मी इथे आहे. फक्त भाग ह्या वर्षाचा शिमगा राहिला याचं दुःख" असं कॅप्शन निलने दिलंय.

निल सालेकर आता थेट अमृता खानविलकर सोबत कलावती सिनेमात दिसणार आहे. काहीच दिवसांपूर्वी कलावती सिनेमाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. यात पडद्याआड अमृता खानविलकरची रहस्यमय नजर दिसतेय.

कलावती मध्ये निल - अमृता सोबतच दिग्गज कलाकारांची फौज असून अमृताची जोडी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने सोबत जमणार आहे.

रोमॅंटिक सिनेमांचे बादशहा संजय जाधव पहिल्यांदाच कलावती सिनेमाच्या माध्यमातून हॉरर कॉमेडी जॉनरचा चित्रपट घेऊन येत आहेत.

मुंबईत आजीवासन स्टुडिओत या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा २६ फेब्रुवारी,२०२३ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याला निल सुद्धा सिनेमातील इतर कलाकारांसोबत उपस्थित होता.

याशिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीतकार,निर्माते आणि दिग्दर्शक अवधूत गूप्ते प्रमुख पाहुणे म्हणून या मुहूर्त सोहळ्यास उपस्थित होते.

तसंच, चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्या दिवशीच प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील पहिलं गाणं देखील रेकॉर्ड करण्यात आलं.

अशाप्रकारे रील स्टार निल आता मोठ्या पडद्यावर त्याच्या अभिनयाची जादू दाखवणार आहे. काहीच दिवसांपूर्वी निल आणि अन्य रील स्टार्सनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी त्यांची भेट घेतली.

तेव्हा राज ठाकरेंनी सर्वांसोबत मनमोकळा संवाद साधून त्यांचं काम जाणून घेतलं. निलला पहिला मराठी सिनेमा मिळाल्याने त्याचे फॅन्स प्रचंड खुश आहेत.