"मुंबईत खूप गर्मी आहे तर.." रील स्टार Karan Sonawane थेट लंडनहून राज ठाकरेंच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

karan sonawane, raj thackeray, karan sonawane reels, focused indian

"मुंबईत खूप गर्मी आहे तर.." रील स्टार Karan Sonawane थेट लंडनहून राज ठाकरेंच्या भेटीला

Reel Star Karan Sonawane Meet Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेत नवीन तंत्रज्ञान आणि कलाकृती संबंधी कायम जागरूक असतात.

राज ठाकरे नवीन कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कायमच पुढे असतात. काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या घरी मराठीतील सुप्रसिद्ध कन्टेन्ट क्रियेटर्सनी त्यांची भेट घेतली. यात Focused Indian फेम करण सोनावणे सुद्धा सहभागी होता.

(reel star karan sonawane meet raj thackeray and shared his experience)

करण त्याच्या आईबाबांसोबत लंडनला फिरायला गेला होता. पण राज ठाकरेंनी स्वतःहून आमंत्रण दिलंय म्हटल्यावर करण लंडनहून थेट शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या घरी पोहोचला.

करणने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून राज ठाकरेंच्या भेटीचा भन्नाट अनुभव सर्वांना सांगितला. राज ठाकरेंना भेटणं हा आयुष्यातला भन्नाट अनुभव आहे, असं करणचं मत आहे.

एका फोटोत राज ठाकरे करणला हात मिळवताना हसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत दोघेही कॅमेरा समोर पोझ देत आहेत. याविषयी करण म्हणाला, "मी त्यांना सांगितलं कि मी लंडनहून मुंबईत उतरलो आणि थेट तुम्हाला भेटायला आलो.

तेव्हा राज ठाकरे म्हणाले, “ मुंबईत खूप गर्मी आहे… तुझ्या हाताचा जरा स्पर्श घेतो म्हणजे ठंड वाटेल” (It’s hot in Mumbai. Let me touch your hand so I can feel the cold)

राज ठाकरे तुमचा टायमिंग कधीच चुकत नाय ! तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं...आपलं वाटलं ! कधीतरी तुमची निवांत मुलाखत घ्यायला मला खूप आवडेल… GENz च्या भाषेत PODCAST" असा भन्नाट अनुभव करणने सोशल मीडियावर शेयर केलाय.

राज ठाकरेंच्या घरी करण सोनावणे सोबतच सिद्धांत सरफरे, नील सालेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, श्रवण शिरसागर, शंतनु रांगणेकर, नीलराज कदम, निखिल धाडवे, तेजस गायकवाड, धनंजय पवार, मनमीत पेम आणि अंकिता वालावलकर उपस्थित होते.

सगळ्या कन्टेन्ट क्रियेटर्सनी राज ठाकरेंसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि धम्माल केली.

याप्रसंगी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही सर्वांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांचं काम जाणून घेतलं. सर्वांसोबत राज ठाकरेंनी फोटो काढले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.