अभिनेत्री रीमा यांच्या वाढदिनी सिनेसृष्टी वाहणार आदरांजली

टीम ई सकाळ
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई : २१ जून नाटक, मालिका आणि चित्रपट या तीन ही माध्यमात आपल्या चतुरस्त्र अभिनयाने स्व:ताचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणारी ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचा जन्मदिवस. त्यांचे कुटुंबीय-मित्रमंडळी दरवर्षी हा दिवस आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत असत. ही प्रतिभावान कलावती १८ मे रोजी अत्यंत आकस्मिकपणे काळाच्या पडद्याआड गेली. या पार्श्वभूमीवर बुधवार २१ जून रोजी त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा एक विशेष स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

रीमाजींच्या सुमारे ४० वर्षाच्या कारकिर्दीतील अनेक महत्वाचे साथीदार, साक्षीदार, कुटुंबीय, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार,मित्र-मैत्रिणी या स्मृती सोहळ्याच्या निमित्ताने रीमाजींच्या आपल्या सहवासाच्या, सहप्रवासाच्या आठवणी जागवणार आहेत. मराठी आणि हिंदी नाट्यचित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत. रीमाजींवर मनापासून प्रेम व्यक्त करणाऱ्या रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. दादर येथील वीर सावरकर प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी, २१ जूनला सायंकाळी ७.३०वा हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रवेशमूल्य आहे.

Web Title: Reema Lagoo birth day 21 june esakal news