'तुम्ही पंतप्रधान न झाल्याची किंमत देश अजूनही मोजतोय' 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 31 October 2020

कंगणाने केलेल्या त्या वादग्रस्त व्टिटमध्ये असे म्हटले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल आपण पंतप्रधान न होणे ही या देशासाठी अत्यंत खेदजनक बाब होती. आपल्या त्या निर्णयाची किंमत संपूर्ण देश मोजतो आहे. असे म्हटले आहे. 

मुंबई - देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनेकांचे योगदान आहे. त्यासाठी हजारों क्रांतीकारकांनी प्राणाची बाजी लावून भारताला पारतंत्र्यातून मुक्त केले. अद्यापही काही नेत्यांचे नाव, त्यांचे नेतृत्व, कर्तृत्वावरुन वाद होताना दिसतो. विशेषत एखाद्या नेत्याच्या जयंती, पुण्यतिथीत्या निमित्ताने संबंधित त्या नेतृत्वाच्या व्यक्तिमत्वावरुन चर्चा सुरु होते.

सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणा-या अभिनेत्री कंगणा राणावतला वाद ओढून घेण्याची आता  सवय झाली आहे. ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम वादाच्या भोव-यात अडकलेली दिसून येते. तिने शनिवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने केलेलं व्टिट हे सर्वांच्या टीकेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर ते व्हायरल होताच त्यावरुन मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगताना दिसत आहे. कंगणाने एक त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे विधान केलं आहे. त्यावरुन तिने पुन्हा एकदा सर्वांची नाराजी ओढून घेतली आहे.

कंगणाने केलेल्या त्या वादग्रस्त व्टिटमध्ये असे म्हटले आहे की, सरदार वल्लभभाई पटेल आपण पंतप्रधान न होणे ही या देशासाठी अत्यंत खेदजनक बाब होती. आपल्या त्या निर्णयाची किंमत संपूर्ण देश मोजतो आहे. एवढ्यावरच कंगणा थांबलेली नाही पुढे ती म्हणते, सरदार वल्लभभाई पटेल कदाचित आपल्याला तो निर्णय पटला असेल. पण देशासाठी तो हितकारक नव्हता. त्यामुळे देशाला वेगळ्या परिस्थितीतून जावे लागत  आहे. जे काही चाललं आहे त्याबद्दल सांगताना आम्हाला लाज वाटत असल्याचेही तिने म्हटले आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या प्रमाणावर देशभर साजरी केली जाते. यादिवशी राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली जाते. कंगणानेही आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे. त्याविषयी भावना व्यक्त करताना ती लिहिते, भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांची निवड करण्यात आली. ती कुणाच्या सांगण्यावरुन, गांधींनी त्यांच्य़ा नावाची शिफारस केवळ ते चांगले इंग्रजी बोलतात म्हणून केली गेली असे वाटते. त्यामुळे आता यासगळ्याची किंमत देशाला मोजावी लागत आहे.

देशाचे पोलादी पुरुष असणा-या सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रध्दांजली वाहताना कंगणा म्हणते, माझा एका गोष्टीवर आता पूर्ण विश्वास बसला आहे तो म्हणजे, गांधीजींनी अतिशय दुबळ्या मनाच्या नेहरुंची निवड केली. त्यांना पंडितजींचे नेतृत्व हवे होते. म्हणून तर पुढे गांधीजींच्या म्हणण्यानुसार त्यांनी आपले नेतृत्वकौशल्य दाखवले. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: regret your decision to sacrifice position as Prime Minister