अशी सुरु झाली होती रेखा आणि मुकेश अग्रवाल यांची  लव्ह स्टोरी, मात्र शेवट झाला दुःखद

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 10 October 2020

रेखाचं करिअर जरी यशाच्या शिखरावर पोहोचलं असलं तरी तिचं वैयक्तिक आयुष्य देखील अनेक वादळांनी भरलेलं आहे. १९९० मध्ये रेखाने बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं. रेखाचं बायोपिक 'द अनटोल्ड स्टोरी'मध्ये तिच्या आणि मुकेश अग्रवाल बाबत विस्तृतपणे सांगितलं आहे.

मुंबई- अभिनेत्री रेखाचा आज १० ऑक्टोबरला वाढदिवस आहे. या वयातही रेखा तिच्या सौंदर्याने आजच्या अभिनेत्रींवरही भारी पडतेय. कांजीवरम साडी आणि भारी भरकम ज्वेलरी, मोकळे केस ही तिची खास ओळख आहे. रेखा आजही कोणत्याही कार्यक्रमाला जाताना सगळे कॅमेरे तिच्याकडे वळतात. तिचं करिअर जरी यशाच्या शिखरावर पोहोचलं असलं तरी तिचं वैयक्तिक आयुष्य देखील अनेक वादळांनी भरलेलं आहे. १९९० मध्ये रेखाने बिझनेसमन मुकेश अग्रवालसोबत लग्न केलं. रेखाचं बायोपिक 'द अनटोल्ड स्टोरी'मध्ये तिच्या आणि मुकेश अग्रवाल बाबत विस्तृतपणे सांगितलं आहे.

हे ही वाचा: चेतन भगत संतापला, म्हणाला सुशांतच्या मृत्युचा तमाशा केला आहे'  

रेखा नेहमी तिची मैत्रीण आणि फॅशन डिझायनर बीना रमानीला भेटायला दिल्लीला जायची. त्यावेळी रेखा अशा व्यक्तीची वाट पाहत होती जी तिच्यावर खूप प्रेम करेल. बीना रमानीनेच रेखाची भेट मुकेश अग्रवालसोबत करुन दिली. त्यावेळी लँडलाईन फोन होते. रेखाला मुकेशला करायची इच्छा नव्हती मात्र बीना रमानीने रेखाला यासाठी मनवलं आणि तिला सांगितलं की तिने एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. मुकेशला विश्वासंच बसत नव्हता की त्याला सुपरस्टार बोलवू शकते. दोघांमध्ये अनेकदा बातचीत व्हायची. मुकेश अग्रवालच्या साधेपणामुळे आणि प्रामाणिकपणामुळे रेखा प्रभावित झाली.

मुकेश अग्रवाल और रेखा

मुकेश आधीपासूनंच रेखावर प्रेम करत होता. जेव्हापण ते दोघं भेटायचे मुकेश रेखाची स्तुतीच करायचे. मार्च १९९० मध्ये जुहुमधील एका मंदिरामध्ये दोघांनी लग्न केलं. एक महिन्यानंतर त्यांनी तिरुपती मंदिरात लग्नाचा कार्यक्रम ठेवला. बॉलीवूडमधील सेलिब्रिटींसोबत भेट झाल्यानंतर दोघेही हनीमुनसाठी लंडनला गेले. लग्नानंतर मुकेश यांना बिझनेसमध्ये नुकसान झालं. त्यामुळे ते चिंतेत होते. मुकेश यांना वाटायचं की रेखाने सिनेमात काम करणं बंद करावं आणि दिल्लीत राहावं. मुकेश नैराश्याच्या अधिन गेला आणि गोळ्या घ्यायचा जे रेखाला माहित नव्हतं. लग्नाच्या सहा महिन्यानंतर रेखाने घटस्फोटासाठी अर्ज केला. आधीच बिझनेस आणि नंतर घटस्फोट यामुळे त्याला नैराश्यातून बाहेर पडणं कठीण झालं. १९९० मध्ये मुकेशने फास लावत आत्महत्या केली.   

rekha and mukesh aggarwal relationship story know about  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rekha and mukesh aggarwal relationship story know about