esakal | बिग बींचा फोटो पाहून रेखा यांची प्रतिक्रिया तुम्हालाही हसायला पाडेल भाग!
sakal

बोलून बातमी शोधा

rekha

क्षणाचाही विलंब न लावता रेखा तिथून निघून गेल्या

बिग बींच्या फोटोवर रेखा यांची प्रतिक्रिया तुम्हालाही हसायला पाडेल भाग!

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अमिताभ बच्चन Amitabh Bachchan आणि रेखा Rekha यांची लव्हस्टोरी सर्वश्रुत आहे. एकेकाळी बिग बी आणि रेखा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र काही कारणास्तव या दोघांच्या नात्यात दुरावा आला. अमिताभ यांनी जया यांच्याशी लग्न केलं तर रेखा मात्र आजही एकट्याच आहेत. काही महिन्यांपूर्वी रेखा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला असून यामधील रेखा यांची प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बु रत्नानी यांच्या कॅलेंडर लाँचिंग कार्यक्रमात फोटोग्राफर्सनी हा व्हिडीओ शूट केला. या कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र त्यात रेखा यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बॉलिवूडमधील दिग्ग्ज आणि नवोदित कलाकारांचे फोटो भिंतीवर लावण्यात आले होते.

हेही वाचा: समीर चौघुलेंसमोर आदराने झुकले अमिताभ बच्चन; पहा खास फोटो

डब्बू रत्नानीने काढलेल्या सेलिब्रिटींच्या या फोटोंसमोर रेखा पोझ देत होत्या. सुरुवातीला त्यांनी डब्बू आणि त्यांच्या मुलांसह फोटो काढले. नंतर फोटोग्राफर्सनी त्यांच्या सोलो फोटोची विनंती केली. यावेळी त्यांच्या मागे अमिताभ बच्चन यांचा फोटो त्यांनी पाहिला. ते पाहताच रेखा तिथून दूर निघून गेल्या. पुढे काही झालंच नाही अशा आविर्भावात त्या वावरत होत्या. काही क्षणांसाठी का होईना, त्या गोंधळल्या होत्या हे कॅमेरांनी कैद केलं होतं.

loading image
go to top