अडचणींच्या काळात सिनेमाने नव्हे तर KBC ने दिली बच्चन यांना साथ!

कृपादान आवळे
Friday, 11 October 2019

'बिग बॉस'चेही सूत्रसंचालन

- उत्तम संभाषण शैली

पुणे : महानायक 'बिग बी' अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस! भारतासह जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेक चित्रपटात अभिनय केला. सध्या ते KBC अर्थात 'कौन बनेगा करोडपती' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमात दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या आर्थिक अडचणींच्या काळात खऱ्या अर्थाने साथ दिली ती KBC नेच.

'कौन बनेगा करोडपती'  आणि अमिताभ बच्चन यांचे नाते गेल्या 19 वर्षांपासूनचे आहे. केबीसीची सुरवात 3 जुलै, 2000 मध्ये झाली. तेव्हा पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Host) केले. त्यानंतर आजपर्यंत ते हा कार्यक्रम करत आहेत. त्यांच्या आवाजाच्या एका विशेष शैलीमुळे ते प्रसिद्ध आहेत. केबीसीची सुरवात स्टार प्लस या वाहिनीवर झाली. त्यानंतर आता हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर दिसत आहे.  

Image may contain: 1 person, glasses

केबीसी या कार्यक्रमाला 2000 पासून सुरवात झाली. आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे 11 सीजन पार पडले. फक्त एक सीजन वगळता उर्वरीत 10 सीजनमध्ये त्यांनी सूत्रसंचालन केले. मात्र, 2007 च्या तिसऱ्या सीजनमध्ये त्यांच्याऐवजी किंग खान शाहरूख खान यांच्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी देण्यात आली.

नमस्कार, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ कौन बनेगा करोडपतीसे!

'कौन बनेगा करोडपती'च्या माध्यमातून अमिताभ बच्चन हे घराघरात पोहचले. या कार्यक्रमात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी स्पर्धकांना चार पर्याय दिले जात होते. यामध्ये 'फोन ए फ्रेंड' हा पर्याय देण्यात येत होता. या पर्यायाद्वारे अमिताभ बच्चन स्पर्धकाच्या परिचयातील व्यक्तीला फोन करत असे आणि त्यांना नमस्कार, मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूँ कौन बनेगा करोडपतीसे, से बोलून प्रश्न विचारत असे. या एका वाक्याने स्पर्धकांसह प्रेक्षकांना याचे विशेष आकर्षण होते.  

उत्तम संभाषण शैली

अमिताभ बच्चन यांची एक विशेष संभाषण शैली आहे. त्यांनी विविध चित्रपटांत काम केल्याने त्यांचा कॅमेरासमोर येण्याचा विशेष असा अंदाज आहे. प्रश्न विचारताना अत्यंत शांतपणे, स्पर्धकांच्या बाजूने विचार करत वेळप्रसंगी त्यांना योग्य तो सल्लाही त्यांच्याकडून दिला जातो. त्यांच्या या उत्तम संभाषण शैलीमुळे त्यांची विशेष एक ओळख आहे.   

'बिग बॉस'चेही सूत्रसंचालन

'बिग बॉस' या रिअॅलिटी शोचा विशेष प्रेक्षक वर्ग आहे. अमिताभ बच्चन यांनी बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या तिसऱ्या सीजनचे सूत्रसंचालनही केले.

Image may contain: 1 person, standing and glasses


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relation of KBC and Amitabh Bachchan