जास्तीच्या वीज बिलावरुन रेणुका शहाणे संतापल्या; ट्विट करत विचारला जाब

Monday, 29 June 2020

मे महिन्यात त्यांचे वीज बील हे 5510 वरुन 18080 झाल्याने त्यांनी या अचानक  बिलामध्ये इतकी वाढ कशी झाली असा प्रश्न विचारत ट्विट केले आहे.

बॉलिवुड अभिनेत्री रेणुका शहाणे या सोशल मिडीयावर चांगल्याच सक्रिय असतात, त्यासोबतच त्या वेगवेगळ्या सामाजिक मुद्द्यांवर व्यक्त होत राहातात. कोरोना व्हायरसमुळे सध्या त्या घरातच बसून आहेत. महिन्यात त्यांचे वीज बील खूपच जास्त आल्याने त्यांनी ट्विटवरती संताप व्यक्त केला आहे.रेणुका शाहणे यांना मे महिन्यात त्यांचे वीज बील हे 5510 वरुन 18080 झाल्याने त्यांनी या अचानक  बिलामध्ये इतकी वाढ कशी झाली असा प्रश्न विचारत ट्विट केले आहे.

अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांची भेट

रेणुका शहाणे यांनी अचानक वाढलेल्या वीज बिलाबद्दल ट्विट करत लिहीले आहे की, “मे महिन्यात मला वीज बिल 5510 रुपये होते. त्यानंतर जून महिन्याच 29,700 रुपये आले. या महिन्याच्या बिलामध्ये मे आणि जूनचे एकत्र बिल देण्यात आले आहे. तुम्ही मे महिन्याचे बिल 18080  रुपये आकारले आहे. पण माझे बिल 5510 रुपयांवरुन 18080  रुपये कसे झाले?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. रेणुका शहाणे यांनी य़ा ट्विट सोबचट बिलाचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. ज्या मध्ये मोबाईल मेसेज मध्ये मे महिन्याचे बिल 5510 रुपये दाखवले आहे, तर बिलात ती रक्कम 18080 दाखवण्यात आली आहे. 

 

चेहऱ्यावर आनंद देणारे स्वरूप भालवणकरचे गाणे "लॉकडाऊन मंडी"...

रेणुका शहाणे यांच्या या ट्विटवर लोक कमेंट करत आहेत, रेणुका शहाणे यांच्या अगोदर अभिनेत्री तापसी पन्नू च्या घरी देखील वाढीव बिल आले होते. तापसीच्या घराचे विज बील 36 हजार रुपये आले होते. तापसीने देखील ट्विट करत विज कंपनीला याबद्दल जाब विचाराला होता. 

entertainment
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Renuka shahane angry on electricity bill says how did 5510 become 18080