ट्रोल करणाऱ्या युझरला रेणुका शहाणेंचे सडेतोड उत्तर

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 एप्रिल 2019

मुंबई - ट्विटरवर परखड मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या कलाकारांमध्ये रेणुका शहाणे नेहमी पुढे असतात. त्यामुळे त्यांना नेहमी ट्रोल देखील केले जाते. अशाच ट्रोल करणाऱ्या एका युझरला मात्र त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

अभय सिंग राजपुत या युझरने त्यांना ''तुम्हाला काही काम नाही का? की आजकाल ट्विटरवरच काम करता.'' असा प्रश्न विचारल्यावर रेणुका शहाणेंनी त्याला उत्तर दिले आहे. ''जे ट्विट करतात त्यांच्याजवळ काही काम नसतं असं तुम्हाला वाटतं का?'' असा प्रश्न रेणुका शहाणे यांनी त्या युझरला विचारला आहे.

तसेच मोठे उद्योगपती, शास्त्रज्ञ, राजकारणी पक्ष, सामान्य लोक जे ट्विट करतात त्यांनाही काही काम नसते असे तुम्हाला वाटते का? असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवाय ट्विटर अकाउंट ट्विट न करता नुसतेच उघडून बसण्यात काय अर्थ आहे. असेही त्या म्हणाल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: renuka shahane slams troller on twitter