ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने सैफ अली खान आणि साराच्या नात्यात आला दुरावा?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 28 September 2020

ड्रग कनेक्शनसोबतंच सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूतच्या रिलेशनशिपबाबत एनसीबी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात अभिनेता आणि साराचे वडिल सैफ अली खान तिला कोणत्याही प्रकारची मदत करण्यास इच्छुक नसल्याचं दिसून येतंय. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरण बॉलीवूडच्या ड्रग कनेक्शन पर्यंत पोहोचलं आहे. या ड्रग कनेक्शनमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं समोर येत आहेत. यात सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खानचा देखील समावेश आहे. साराचं नाव ड्रर प्रकरणात समोर आलं आहे. या ड्रग कनेक्शनसोबतंच सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूतच्या रिलेशनशिपबाबत एनसीबी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात अभिनेता आणि साराचे वडिल सैफ अली खान तिला कोणत्याही प्रकारची मदत करण्यास इच्छुक नसल्याचं दिसून येतंय. 

बर्थडे स्पेशल: लता मंगेशकर यांचं लहानपण होतं संघर्षमय, 'या' कारणासाठी केलं नाही लग्न  

बॉलीवूडमध्ये अशी चर्चा आहे की सारा सध्या तिच्याभोवती असलेल्या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी तिचे वडिल सैफवर अवलंबून नाहीये. रिपोर्ट्सनुसार, २५ वर्षांची असलेल्या सारा अली खानचे वडिल सैफ अली खान या ड्रग प्रकरणात मुलीची मदत करणार नसल्याचं म्हटलं जातंय. इतकंच नाही तर सैफ त्याची पूर्व पत्नी अमृता सिंहवर देखील संतापल्याचं बोललं जातंय जी तिच्या मुलीच्या करिअरशी संबंधित सर्व निर्णय घेते. सैफअली खान पत्नी करिना आणि मुलगा तैमुरसोबत दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय. 

एनसीबीने ड्रग प्रकरणात सारा अली खानची जवळपास ४ तास चौकशी केली होती. या चौकशीत साराने ड्रग्सचं सेवन करण्याच्या गोष्टीला नकार दिला आणि केवळ सिगारेट पीत असल्याचं कबुल केलं. साराने रिया चक्रवर्तीचे आरोप फेटाळून लावले आहेत ज्यामध्ये तिने म्हटलं होतं की साराने केदारनाथ सिनेमाच्या शूटींग दरम्यान ड्रग्सचा हाय डोस घेतला होता.

Sara Ali Khan shares Sushant Singh Rajput and father Saif Ali Khan's BTS  photos from Dil Bechara sets | Celebrities News – India TV

काही रिपोर्ट्सनुसार हे देखील समोर येत आहे की साराने एनसीबीसमोर स्विकारलं आहे की ती सुशांतला डेट करत होती आणि काही कारणांमुळे त्यांचं ब्रेकअप देखील झालं होतं. सारा अली खान सुशांतसोबत केदारनाथ सिनेमात झळकली होती तर सुशांत त्याच्या शेवटच्या दिल बेचारा सिनेमामध्ये सैफ अली खानसोबत झळकला होता. असं म्हटलं जातं की या सिनेमाच्यावेळी सुशांतमधील टॅलेंट पाहून सैफ त्याच्यावर खुश होता.  

as per reports sara ali khan father saif does not want to help her in the drug case  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: as per reports sara ali khans father saif ali khan does not want to help her in the drug case