'प्रतिष्ठा हा सर्वांत पवित्र खजिना'; मुंबई कोर्टाकडून सलमानला दिलासा

सलमानने केआरकेसह इतर नऊ जणांविरोधात दाखल केला होता मानहानीचा खटला
Salman Khan
Salman Khan

"प्रतिष्ठा आणि सन्मान या गोष्टी एका चांगल्या व्यक्तीसाठी शारीरिक सुरक्षा आणि स्वातंत्र्याइतक्याच महत्त्वाच्या असतात", असं सिटी सिव्हिल कोर्टाचे न्यायाधीश सी. व्ही. मराठे यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान नमूद केलं. अभिनेता सलमान खान Salman Khan, त्याचं कुटुंब आणि सलमान खान व्हेंचर्स या त्याच्या निर्मिती संस्थेविरोधात कोणत्याही अभिनेत्याला आणि चित्रपट समिक्षकाला बदनामीकारक विधान, व्हिडीओ, पोस्ट किंवा रिपोस्ट करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. सलमान खानने स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमार आर खान Kamaal R Khan आणि इतर नऊ जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. (Reputation is purest treasure says Mumbai Court grants interim relief to Salman Khan)

"चित्रपटावर किंवा कलाकारांच्या अभिनयावर भाष्य करण्यास कोणतेही बंधन नसेल तरी सलमान खानवरील वैयक्तिक आरोप निराधार आहेत", अशी भूमिका सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी कोर्टात मांडली. तर दुसरीकडे चित्रपट समिक्षकांचे वकील मनोज गडकरी यांनी मत व्यक्त केले की, "सलमान खान एक सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्याच्यावरील टीकेसाठी बंधनं नसावित. प्रतिवादी क्रमांक एकने केवळ राधे चित्रपटाविषयी आपले मत व्यक्त केले होते." भारतीय संविधानानुसार समिक्षकाला बोलण्याचं स्वातंत्र्य असल्याचं सांगत सलमानने खटला दाखल करणे म्हणजे केवळ लोकांमध्ये दहशत निर्माण करणे असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं.

Salman Khan
शाहरूख की सलमान; विद्यानं दिलं भन्नाट उत्तर...

"एका व्यक्तीची ओळख ही त्याच्या नावाने होते. त्याच्या नावाचं कदाचित समाजाला कोणतंही मूल्य असू शकत नाही, परंतु संबंधित व्यक्तीसाठी ते मौल्यवान असतं. चांगलं नाव हे श्रीमंत होण्यापेक्षाही चांगलं असतं. प्रतिष्ठा म्हणजे केवळ जीवनाचे सारच नाही तर सर्वांत पवित्र खजिना आणि सर्वांत मौल्यवान सुगंध आहे", असं न्यायाधीशांनी नमून केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com