मांजा रिव्ह्यू : Live : नजर खिळवून ठेवणारी शाॅककथा

सौमित्र पोटे/ कॅमेरा : योगेश बनकर.
शुक्रवार, 21 जुलै 2017

मांजा या चित्रपटाच्या निमत्ताने एक सायकोथ्रिलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नेटकी पटकथा, चांगले संवाद आणि त्याला दिलेली उत्तम अभिनयाची जोड यामुळे ही भट्टी चांगली जमून आली आहे. या चित्रपटाला ई सकाळने दिले आहेत, 4 चीअर्स. 

पुणे : मानवी मनाचे काहीच सांगता येत नाही. तुमच्या मनाावर कोणते संस्कार झाले आहेत, नकळत्या वयात तुमच्यावर कोणते, कसे आघात झाले आहेत, यावर तुमची मानसिकता अवलंबून असते. या मनाला योग्यरित्या सांभाळलं नाही, तर मात्र त्यातून माषेफिरू जन्माला येतात. आपल्या अवतीभवती असे माथेफिरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच गोष्टीभवती मांजा फिरतो. एक नजरबंद चित्रपट पाहण्याची संधी यानिमित्ताने रसिकांना मिळाली आहे. ई सकाळने या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू केला. विशेष म्हणजे, दिग्दर्शक जतीन वागळे, अश्विनी भावे, सुमेध मुदगलकर आणि रोहित फाळके यांनीही या उपक्रमात सरभाग घेतला. ई सकाळने या चित्रपटाला दिले 4 चीअर्स. 

#Live रिव्ह्यू मांजा.. 

पतीपासून विभक्त झाल्यावर आईबरोबर  जयदिप मुलासह लोणावळ्याला स्थायिक होतो. आणि त्यांच्या आय़ुष्यात विक्रम प्रगटतो. विक्रम आणि जयदिपची जोडी जमते. अनेक प्रसंगांमधून विक्रम जयदिपला वाचवतो. पण नंतर विक्रमचे खरे रूप जयदिपच्या लक्षात येऊ लागते. त्यातून मांजा चित्रपट उलगडत जातो. 

दिग्दर्शन, संगीत, कलादिग्दर्शन, छायांकन या सर्वच बाबतीत चित्रपट चांगला झालाय. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध चांगले जुळून आले आहेत. या चित्रपटाचा लाईव्ह रिव्ह्यू ई सकाळने केला त्यावेळी यातील कलाकर आणि दिग्दर्शक उपस्थित होते. या चित्रपटाला ई सकाळने दिले चार चीअर्स. 

Web Title: Review Manjha live esakal news