Pravas Review : जीवनाचा वेगळा दृष्टीकोन मांडणारा 'प्रवास'!

संतोष भिंगार्डे
Friday, 14 February 2020

अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, विक्रम गोखले अशा सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. अभिनेता श्रेयस तळपदेची एन्ट्री सुखावह आहे.

चित्रपट - प्रवास

आज प्रत्येक जण सुखाच्या मागे धावत आहे. या धावपळीत तो काही ना काही तरी गमावत आहे. परंतु सततच्या धावपळीत आणि कामाच्या रहाटगाड्यात त्याची कल्पना त्याला येत नाही आणि जेव्हा ही कल्पना येते तेव्हा त्याच्या हातातून वेळ निसटून गेलेली असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयुष्याच्या एका वळणावर आपण थांबलो आहोत की काय अशी भावना त्याच्या मनात निर्माण होते, आपल्याला कुठे जायचे होते आणि आपण कुठे आलो असेही त्याला वाटत असते आणि मग तो एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो. शशांक उदापूरकरच्या प्रवास या चित्रपटात हेच मांडलेले आहे.

- Valentine Special : मराठीतील या रोमॅंटिक कपल्सचा सोशल मीडियावर बोलबाला !

अभिराज इनामदार (अशोक सराफ) आणि लता इनामदार (पद्मिनी कोल्हापुरे) हे आनंदी आणि सुखी जोडपे. त्यांची आणि त्यांच्या भावनिक प्रवासाची ही कथा आहे. अभी आणि लता सुखाने संसार करीत असतात. घर-गाडी वगैरे सगळे त्यांच्याकडे असते. त्यांचा एक मुलगा असतो दिलीप (शशांक उदापूरकर) तो अमेरिकेत काम करीत असतो. अभिराज आता उतार वयाकडे झुकलेले असतात. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झालेल्या असतात.

Image may contain: 2 people, people sitting, child and indoor

- Love Aaj Kal Review : स्टोरीटेलर इम्तियाजची गहिऱ्या प्रेमाची भावूक गोष्ट!

आठवड्यातून दोन दिवस त्यांना रुग्णालयात डायलिसीससकरिता जावे लागते. त्यांचे शरीर जरी थकलेले असले तरी मनाने ते थकलेले नसतात. आजही जगण्याची नवी उमेद ते बाळगून असतात. अशातच एक घटना अशी घडते की त्यांच्या आयुष्याची दुसरी इनिंग आणि तीदेखील नव्या उमेदीची असते. त्यांच्या जीवनाचा वेगळा प्रवास सुरू होतो. मग पुढे काय व कशा घडामोडी घडतात हे पडद्यावर पाहिलेले बरे.

Image may contain: 5 people, people standing

- बाप-लेकीचं नातं आणि इरफानच्या इंग्रजीची कॉमेडी, पाहा ‘अंग्रेजी मीडियम’चा ट्रेलर

दिग्दर्शक शशांक उदापूरकरने जीवनाला एक वेगळा दृष्टिकोन देणारी कथा या चित्रपटात मांडली आहे आणि त्याला कलाकारांनी आपल्या अभिनयाने चार चांद लावले आहेत. अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, विक्रम गोखले अशा सगळ्याच कलाकारांचा अभिनय उत्तम झाला आहे. अभिनेता श्रेयस तळपदेची एन्ट्री सुखावह आहे. हे सगळेच कलाकार अनुभवी आहेत आणि त्यांनी कमालीचा अभिनय केला आहे.

Image may contain: 10 people, people standing

चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी झकास झाली आहे. विशेष करून मनाली येथील दृश्‍ये सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांनी आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. सलीम-सुलेमान यांचे संगीत चांगलेच जमलेले आहे. मात्र चित्रपट फारच गंभीर वळणाने जाणारा आहे. जीवनाचा वेगळा दृष्टीकोन मांडणारा हा चित्रपट आहे.

दर्जा : तीन स्टार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Review of Marathi Movie Pravas starred by Ashok Saraf and Padmini Kolhapure