Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput
Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput

'तुझी खूप आठवण येते'; रिया चक्रवर्तीने पोस्ट केला सुशांतसोबतचा व्हिडीओ

चाहते सुशांतच्या आठवणीत भावूक

'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने स्वत:च्या बळावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केलं होतं. कमी वयात सुशांतने यशाची शिखरं गाठली होती, मात्र तो आज आपल्यात नाही, ही भावनाच त्याच्या अनेक चाहत्यांच्या मनाला चटका लावून जाते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) आज जन्मदिन. यानिमित्ताने अभिनेत्री रिया चक्रवर्तीने (Rhea Chakraborty) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्यासोबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 'तुझी खूप आठवण येते' असं कॅप्शन देत रियाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. रिया आणि सुशांत एकमेकांना डेट करत होते. या व्हिडीओमध्ये दोघंही जिममध्ये फोटोसाठी पोझ देताना दिसत आहेत.

रियाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'सुशांतची सर्वांना आठवण येतेय', असं एकाने लिहिलं. तर 'तू खंबीर रहा' असं दुसऱ्याने म्हटलंय. सुशांतच्या जन्मदिनानिमित्त अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर मेसेज लिहिला आहे. तर काहींनी त्याच्या आठवणी व्हिडीओ आणि फोटोंच्या रुपात सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.

Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput
'पुष्पा'वर बंदी घाला; गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

१४ जून २०२० रोजी मुंबईतल्या राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान रिया चक्रवर्तीवर पैसे उकळल्याचा आरोप झाला. ड्रग्ज कनेक्शनच्या तपासात रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना एनसीबीनं अटक केली होती. मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये रिया महिनाभर होती तर तिचा भाऊ शौविक याने तीन महिने तुरुंगात काढले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिला जामिन मंजूर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com