बॉलीवूडमध्ये मराठमोळ्या नावाचा अनेकांनी घेतलाय धसका, एनसीबीचा 'हा' अधिकारी आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा पती

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 25 September 2020

सुशांत प्रकरणात आरोपी म्हटल्या जाणा-या रिया चक्रवर्तीच्या घरात छापा टाकल्यानंतर तिची बराचवेळ चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात एनसीबीला लीड करत करणारे हेच ते ऑफीसर आहेत समीर वानखेडे. 

मुंबई- सुशांत सिंह राजपुत प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून ड्रगच्या दिशेने तपास सुरु आहे. या प्रकरणात ड्रग कनेक्शन समोर येताच नारकोटीक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी ऍक्शन मोडमध्ये आली आहे. सुशांत प्रकरणात आरोपी म्हटल्या जाणा-या रिया चक्रवर्तीच्या घरात छापा टाकल्यानंतर तिची बराचवेळ चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणात एनसीबीला लीड करत करणारे हेच ते ऑफीसर आहेत समीर वानखेडे. 

हे ही वाचा: अनुष्का शर्माने सुनील गावस्करांच्या 'त्या' कमेंटला दिलं सडेतोड उत्तर  

समीर वानखेडे २००८ च्या बॅचचने आयपीएस अधिकारी आहेत. सगळ्यात आधी ते कस्टम विभागात होते. भारतीय महसुल विभागात आल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टवर डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. कस्टमनंतर त्यांची बदली नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये झाली.

SSR case: Tough Cop Sameer Wankhede to probe drugs conspiracy - News  Karnataka | DailyHunt

समीर वानखेडे यांनी गेल्या दोन वर्षांत जवळपास १७ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स पकडले आहेत. त्यांनी आत्तापर्यंत अनुराग कश्यप, विवेक ऑबेरॉय, रामगोपार वर्मा यांच्यासोबतंच अनेक बॉलीवूडकरांच्या जागेवर छापेमारी केली आहे. २०१३ मध्ये समीर वानखेडे यांनी मुंबई एअरपोर्टवर प्रसिद्ध गायक मिका सिंहला बेकायदेशीर विदेशी करंसीसोबत पकडलं होतं. 

Rhea summoned, what NCB officer Sameer Wankhede has to say? - video  dailymotion

समीर वानखेडे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि निर्माती क्रांती रेडकरचे पती आहेत. दोघांनी २०१७ मध्ये एकमेकांसोबत विवाह केला होता. क्रांती रेडकरने प्रकाश झा यांच्या 'गंगाजल' सिनेमात अजय देवगणसोबत काम केलं आहे. तसंच मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये क्रांती कार्यरत आहे. नुकत्याच तिला दोन जुळ्या मुली झाल्या आहेत. त्यांच्या नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील क्रांतीने सुरु केला आहे. इंस्टाग्रामवर क्रांतीचे मेकअप व्हिडिओ तसेच मजेदार व्हिडिओ खूप चर्चेत असतात.   

Kranti Redkar Wiki, Age, Boyfriend, Husband, Family, Biography & More –  WikiBio

 

Kranti Redkar gets married with Sameer Wankhede - MarathiCelebs.com

rhea chakravarti ssr case ncb officer sameer wankhede married to marathi actress kranti redkar  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakravarti ssr case ncb officer sameer wankhede married to marathi actress kranti redkar