रिचा चड्डा करणार स्टॅंडअप कॉमेडी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

आजवर रिचा चड्डाच्या बिनधास्त आणि बोल्ड भूमिका चर्चेचा विषय ठरल्या. 

नवी दिल्ली : आजवर रिचा चड्डाच्या बिनधास्त आणि बोल्ड भूमिका चर्चेचा विषय ठरल्या. तिच्या या भूमिकांना सिनेरसिकांची तितकीच दादही मिळाली. नव्या चित्रपटासह नवनवीन प्रयोग करू पाहणारी रिचा आता स्टॅंडअप कॉमेडीकडे वळली आहे.

ॲमेझॉन ओरिजनलच्या ‘वन माईक स्टॅंड’ या सीरिजमध्ये ती स्टॅंडअप कॉमेडी करताना दिसणार आहे. याचबाबत रिचा म्हणते, ‘मला वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडतात. मला जेव्हा स्टॅंडअप कॉमेडीसाठी विचारण्यात आलं तेव्हा आपण हे केलं पाहिजे, असा विचार माझ्या मनात आला. म्हणून प्रेक्षकांना हसवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या सीरिजमधून करणार आहे.’

web title : Richa Chadda will perform standup comedy


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Richa Chadda will perform standup comedy