Riccha Chaddha: डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, रिचाच्या ट्विटला भाव आला|Richa Chadha tweet falling Indian rupee | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Richa chadha news

Riccha Chaddha: डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला, रिचाच्या ट्विटला भाव आला

Richa Chadha: भारतीय अर्थव्यवस्थेविषयी चिंतेत टाकणारी बातमी सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. यासगळ्यात बॉलीवूडच्या काही सेलिब्रेटींनी आपली नाराजी (Bollywood Actress) व्यक्त केली आहे. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रिचा चढ्ढाचे नाव घेता येईल. आपल्या वादग्रस्त आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणाऱ्या (Indian Rupees News) रिचानं आता डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यानंतर त्याचा निषेध व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर रिचाच्या त्या ट्विटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रिचा काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे.

भारतीय रुपया हा 13 रुपयांनी घसरला आहे. आतापर्यत रुपयाची ही सर्वात मोठी घसरण असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरुन रिचानं ट्विट केलं असून ते चर्चेत आलं आहे. रिचानं त्या व्टिटच्या माध्यमातून सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त (Entertainment News) केली आहे. रिचा म्हणते, रुपयाची सातत्यानं होणारी घसरण पाहून तो देखील नाराज झाला आहे. तो आता म्हणत असेल की, मला आणखीन मान खाली घालावी लागणार आहे. अशा पद्धतीनं आपण लवकरच शतक पूर्ण करणार असल्याचे रिचानं म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर त्या ट्विटला चांगलाच भाव आला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काहींनी रिचाला नेहमीप्रमाणे ट्रोलही केले आहे.

रिचाच्या त्या ट्विटवर संजीव गोयल यांनी लिहिलं आहे की, निर्यात क्षेत्रामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्याचा परिणाम रुपयावर झाला आहे. आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत. त्याचा फटका आपल्याला बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा भाव हा आणखी 63 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा लागेल.

आता अमेरिकन डॉलर हा इंडियन करन्सीनुसार 79.58 रुपये झाला आहे. यंदाच्या वर्षी मार्चपासून भारतीय रुपयाच्या दरात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासगळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे सोशल मीडियावर चर्चेला वेगळाच रंग येत असल्याचे दिसून आले आहे.