असा लघुपट होणे नाही... 

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

अभिनेत्री रिचा हिची पहिली निर्मिती असलेला पंजाबी लघुपट "खून आली चिठी'ला मिळालेलं यश व प्रशंसेमुळे सध्या रिचा भलतीच खूश आहे. या लघुपटाचा विषय 1980च्या दशकातील खलिस्तान आंदोलनाचा सामान्य जनतेवर पडलेला प्रभाव असा आहे. हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या रसिकांनी या लघुपटाचं खूप कौतूक केलं. यात सामाजिक संदेश देण्यात आलाय. तसेच पंजाबमध्ये झालेल्या अत्याचार व अन्यायावर भाष्य करण्यात आलंय. त्यामुळे विविध समुदायातील लोकांनी हा लघुपट विविध भाषेत प्रदर्शित करण्याची विनंती केली होती. आता रिचाने त्यांच्या विनंतीला मान देत या लघुपटाला सबटायटल देण्याचं ठरवलं.

अभिनेत्री रिचा हिची पहिली निर्मिती असलेला पंजाबी लघुपट "खून आली चिठी'ला मिळालेलं यश व प्रशंसेमुळे सध्या रिचा भलतीच खूश आहे. या लघुपटाचा विषय 1980च्या दशकातील खलिस्तान आंदोलनाचा सामान्य जनतेवर पडलेला प्रभाव असा आहे. हा लघुपट अनेक चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. तिथे उपस्थित असलेल्या रसिकांनी या लघुपटाचं खूप कौतूक केलं. यात सामाजिक संदेश देण्यात आलाय. तसेच पंजाबमध्ये झालेल्या अत्याचार व अन्यायावर भाष्य करण्यात आलंय. त्यामुळे विविध समुदायातील लोकांनी हा लघुपट विविध भाषेत प्रदर्शित करण्याची विनंती केली होती. आता रिचाने त्यांच्या विनंतीला मान देत या लघुपटाला सबटायटल देण्याचं ठरवलं. याबाबत रिचा सांगते की, या लघुपटातील संदेश खूप महत्त्वपूर्ण आहे. हा लघुपट जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, अशी माझी इच्छा आहे. हा चित्रपट बनवण्याचं कारण हेही होतं की, यात काही प्रमुख मुद्दे प्रकाशझोतात आणले आहेत. जे सगळ्यांना माहीत असणे गरजेचे आहे. या लघुपटात प्रेम, शांतीचा संदेश देण्यात आलाय. थोडक्‍यात रिचाला म्हणायचंय असा लघुपट होणे नाही. 

Web Title: richa shortfilm