'आमची इंटरनॅशनल कोंबडी'; अजय-अतुलच्या गाण्यावर अमेरिकन व्यक्तीचा भन्नाट डान्स

ricky pond
ricky pond

भरत जाधवच्या 'जत्रा' या चित्रपटातील 'कोंबडी पळाली' हे गाणं प्रचंड गाजलं. अजय-अतुलचं या गाण्याचे बोल अभिनेता जितेंद्र जोशीने लिहिले होते. लग्नाच्या वरातीपासून ते अगदी कॉलेजमधल्या डान्सपर्यंत हे गाणं सगळीकडे आवर्जून लावलं जायचं. आजही या गाण्याची क्रेझ तशीच असून आता ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. 'कोंबडी पळाली' या गाण्यावर एका अमेरिकन व्यक्तीने भन्नाट डान्स केला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतोय. भरत जाधव व जितेंद्र जोशी यांनीसुद्धा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर डान्सचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.

'गाणं लिहिताना अजय अतुलला म्हणालो होतो की हे गाणं सुपरहिट होईल असं वाटतंय. पण इतकं दूरवर पोहोचल्याची कल्पना नव्हती. अर्थातच श्रेय अजय अतुलचंच,' अशी पोस्ट जितेंद्रने लिहिली तर भरत जाधवने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'संगीताला भाषेची मर्यादा नसते हेच खरं. हे गाणं अनेक देशातील लोक अजूनही एंजॉय करतात याचा आनंद आहे. आमची इंटरनॅशनल कोंबडी.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

या व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या व्यक्तीचं नाव रिकी पाँड असं आहे. रिकी पाँड हे सोशल मीडियावर लोकप्रिय असून 'डान्सिंग डॅड' म्हणूनही ते ओळखले जातात. ४७ वर्षीय रिकी हे तमिळ, तेलुगू, हिंदी गाण्यांवरही डान्सचे विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. त्यांच्या या व्हिडीओमध्ये त्यांची पत्नी व मुलंसुद्धा साथ देताना दिसतात. त्यांच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com