बिग बींसोबत काम करण्याच्या आनंद राहिला बाजुला, सध्या रिंकू राजगुरुची 'या' गोष्टीने उडालीये झोप...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

अभिनेत्री रिंकु राजगुरु सध्या लॉकडाऊनमुळे सोलापूर येथील तिच्या अकलुज गावात राहत्या घरी आहे. मात्र एका अफवेमुळे रिंकूची झोप उडाली आहे.

मुंबई- सैराट फेम आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या यशाच्या शिखरावर आहे. पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या रिंकूंच्या कारकिर्दीत आणखी एका सिनेमाने भर पडणारे तो सिनेमा म्हणजे झुंड. रिंकूला झुंड या सिनेमात बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळणार आहे. भल्या भल्यांचं अमिताभ यांच्यासोबत झळकण्याचं स्वप्न असतं. मात्र रिंकुला ही संधी तिच्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातंच मिळाली आहे. मात्र रिंकुला बिग बींसोबत झळकण्याच्या आनंदापुढे एक एक गोष्ट आहे त्याची चिंता तिला जास्त आहे.

हे ही वाचा: अभिनेत्री सुष्मिता सेन चार वर्ष या आजाराने होती ग्रस्त, 'थकलेलं शरिर आणि..'

अभिनेत्री रिंकु राजगुरु सध्या लॉकडाऊनमुळे सोलापूर येथील तिच्या अकलुज गावात राहत्या घरी आहे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांच्या परिक्षा रद्द केल्याआहेत तरी काहींच्या परिक्षा पुढे ढकलल्या आहेत. अशातंच रिंकुलासुद्धा तिच्या परिक्षेची चिंता सतावतेय. परिक्षा रद्द होणार अशा अफवांनी सध्या रिंकू चिंतेत आहे. 

रिंकू सांगतेय, 'आमची परिक्षा रद्द झालीये अशी एक अफवा पसरत आहे. आमची परिक्षेची सगळी तयारी झाली आहे मात्र आता असं म्हटलं जातंय की आमच्या परिक्षा होणार नाहीत. सध्या हे सांगणं खूप कठीण आहे की जेव्हा नवीन सत्र सुरु होईल तेव्हा ते कसं असेल आणि आमच्याकडून कशी त्याची तयारी होईल?'

Jhund (film) - Wikipedia

रिंकूने २०१६ मध्ये 'सैराट' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'सैराट' हा सिनेमा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला होता. आता रिंकू लवकरंच अमिताभ यांच्यासोबत नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रिंकू जरी सिनेमांमध्ये काम करत असली तरी तिला पहिले तिचं शिक्षण पूर्ण करायचं आहे.

रिंकू सांगते, माझे आई-वडिल सांगत आहेत की इतर कामं हाती घेण्याआधी पहिले शिक्षण पूर्ण कर. त्यामुळे शिक्षण सोडून अभिनयावर जोर देऊ शकत नाही. नुकतीच रिंकू लारा दत्ता सोबत 'हंड्रेड' या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.     

rinku rajguru worried about her education she is going to share screen with amitabh bachchan in jhund  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rinku rajguru worried about her education she is going to share screen with amitabh bachchan in jhund