Ranbir Kapoor ने अर्ध्यावरच सोडून दिलेला 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा.. मात्र याच सिनेमानं फळफळलं होतं हृतिकचं नशीबHrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor, Hrithik Roshan

Ranbir Kapoor ने अर्ध्यावरच सोडून दिलेला 'हा' ब्लॉकबस्टर सिनेमा.. मात्र याच सिनेमानं फळफळलं होतं हृतिकचं नशीब

Ranbir Kapoor: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरला इंडस्ट्रीमध्ये अनेक वर्ष आता झाली आहेत. इंडस्ट्रीतील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. रणबीर कपूरनं अनेक सिनेमे केले ज्यांनी बॉक्सऑफिसवर मोठे रेकॉर्ड्सही केले पण तुम्हाला माहित आहे का असा एक सिनेमा होता ज्याला रणबीरनं अर्ध्यातच सोडलं होतं आणि पुढे जाऊन तो सिनेमा सुपरहिट ठरला होता.

आजही या सिनेमाच्या चर्चा रंगताना दिसतात आणि लोक याला पाहणं पसंत करतात. रणबीरनं त्याच्या त्या अर्ध्यातनंच सोडलेल्या सिनेमाचा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता आणि त्या मुलाखतीत हे देखील कळलं होतं की तो सिनेमा सोडल्यावर त्याचे वडील अभिनेते ऋषि कपूर त्याच्यावर भडकले होते.

चला जाणून घेऊया की रणबीर नेमका कोणत्या सिनेमातून वॉक आऊट झाला होता आणि त्यानं या संदर्भात कधी खुलासा केला होता.(Rishi Kapoor Angry with ranbir kapoor actor walked out the blockbuster movie and hrithik entered in movie)

तुमच्या माहितीसाठी इथे सांगतो की रणबीर कपूर 'बॉम्बे वेल्वेट' च्या एका प्रमोशनल मुलाखती दरम्यान गेम खेळत होता ज्यामध्ये त्याला विचारलं गेलं की,'त्यानं कधी कोणता सिनेमा मधनंच सोडला आहे का? तो कधी कोणत्या सिनेमातून वॉक आऊट झाला आहे का?'

त्यावर रणबीरनं पहिलं तर सांगितलं की हो त्यानं असं केलं होतं. पुढे त्याला यावर विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला की, ज्या सिनेमातून त्यानं वॉक आऊट केलं होतं ,त्या सिनेमाचं नाव 'जोधा अकबर' होतं.

याच मुलाखतीत त्यानं 'जोधा -अकबर' सिनेमाचं नाव घेत म्हटलं होतं की तो या सिनेमाला अर्ध्यातनंच सोडून गेला होता. रणबीर म्हणाला की त्याच्या या निर्णयानं त्याचे वडील ऋषि कपूर खूप नाराज झाले होते. रणबीर कपूर म्हणाला की त्यानंतर त्यानं कधीच कोणत्या सिनेमाला अर्ध्यातनंच न सोडण्याचा निर्णय घेतला.

'जोधा अकबर'मध्ये नंतर अभिनेता हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय मुख्य भूमिका साकारताना दिसले होते. आशुतोष गोवारिकर यानं हा सिनेमा २००८ मध्ये रिलीज केला होता आणि या सिनेमासाठी त्याने तीन इंटरनॅशनल अॅवॉर्ड्स, दोन नॅशनल अॅवॉर्ड्स,पाच फिल्मफेअर अॅवॉर्ड्स,दहा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी अॅवॉर्ड्स आणि सात स्टार स्क्रीन अॅवॉर्ड्स जिंकले होते.

२००८ मध्ये सगळ्यात अधिक कमाई करणारा सिनेमा तो ठरला होता. बॉक्सऑफिसवर १०८ करोड रुपये या सिनेमानं कमावले होते. हा सिनेमा ४० करोडच्या बजेट मध्ये बनला होता.