ऋषी कपूर यांनी जिंकली कॅन्सरविरोधातील लढाई!

Rishi Kapoor
Rishi Kapoor

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर काही दिवसांपासून अमेरिकेत आजारावर उपचार घेत आहे. त्यांना कोणता आजार आहे याची माहिती त्यांचे कुटुंबिय देत नसले, तरी त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सोशल मीडियाद्वारे त्यांचे कुटुंब देत असते. अशातच ऋषी कपूर यांचे मित्र व फिल्ममेकर राहुल रावेल यांनी 'ऋषी कपूर (चिंटू) कॅन्सरमुक्त' झाल्याचे सांगितले आहे.

आपल्या फेसबुक अकाऊंटवरून राहुल यांनी ही माहिती दिली. यापूर्वी ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी त्यांना कोणता आजार झाला आहे, हे स्पष्ट केले नव्हते. पण त्यांना कॅन्सर असल्याची सर्वत्र चर्चा होती. अशातच राहुल यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करत 'RISHI KAPOOR (CHINTU) is CANCER FREE!!!!' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे आता ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे.

काही महिन्यांपूर्वी कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित 'मी या उपचारांमुळे थकलो आहे, हा उपचार आणखी काही दिवस सुरू राहणार आहे. हळू हळू प्रकृतीत सुधारणा होत आहे, लवकरच मी काम सुरू करेन.' असे सांगितले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com