coronavirus: ऋषी कपूर यांना पाकिस्तानी जनतेची काळजी, वाचा काय म्हणाले..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय पाहून बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्वीट केलंय जे सध्या सोशल मिडीयावर चांगलंच व्हायरल होतंय.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारत सरकारने अनेक कठोर पावलं उचलली आहेत..सोबतंच 22 मार्चला देखील लोकांनी रस्त्यांवर गर्दी न करता आपापल्या घरी रहावे यासाठी एक दिवसाचा जनता कर्फ्यु लावण्यात आलाय..पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा निर्णय पाहून बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी एक ट्वीट केलंय जे सध्या सोशल मिडीयावर चांगलंच व्हायरल होतंय.

हे ही वाचा: राखी सावंतची कोरोनावर मुक्ताफळं, म्हणाली 'तुमच्या कर्मांची फळं'

ऋषी कपूर यांनी आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिलाय...यासोबतंच त्यांनी पाकिस्तान आमच्यासाठी देखील प्रिय आहे.आणि एक काळ होता जेव्हा आपण दोन देश एकत्र होतो असं म्हटलंय..यामुळे ऋषी यांचं हे ट्वीट सोशल मिडीयावर चांगलंच चर्चेत आलंय..आणि यावर लोक मोठ्या प्रमाणावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत..

ऋषी कपूर यांनी आपल्या या ट्वीटमध्ये पाकिस्तानबाबत काळजी व्यक्त करत म्हटलंय, ''पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या देशातील लोकांसाठी तसंच नागरिकांच्या आरोग्यासाठी काही ठोस उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी योग्य सल्ल्याची आवश्यकता आहे..पाकिस्तानातील जनता देखील आम्हाला प्रिय आहे..एक काळ होता जेव्हा आपण सर्व एक होतो...त्यामुळे आम्हाला त्याचीही काळजी आहे..सध्या हे जागतिक संकट सुरु आहे...त्यामुळे इथे अहंकार आडवा येऊ नये.  आम्ही पाकिस्तानी नागरिकांवरही तितकंच  प्रेम करतो. माणुसकीचा विजय असो'', असं ट्वीट ऋषी कपूर यांनी केलं आहे..

Image result for rishi kapoor cry

अभिनेते ऋषी कपूर नेहमीच चालू घडामोडींवर आपलं मत सोशल मिडीयाद्वारे व्यक्त करताना दिसून येतात..अनेकवेळा त्यांच्या स्पष्टवक्तेमुळे ते ट्रोल देखील होतात..मात्र ट्रोलर्सनाही ते परखडपणे उत्तर देतात..त्यातंच कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातल्याने याबाबत सुरक्षितता बाळगण्यासाठी अनेक दिग्गज पुढे येऊन सल्ले देत आहेत..

rishi kapoor concerned about pakistan people over coronavirus actor gives advise to imran khan


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rishi kapoor concerned about pakistan people over coronavirus actor gives advise to imran khan