पाकिस्तानमध्ये आजही आहे १०२ वर्ष जुनी 'कपूर हवेली', मरण्याआधी भेट देण्याची ऋषी कपूर यांची होती इच्छा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

ऋषी कपूर यांचं पाकिस्तानसोबत जुनं नातं आहे. पेशावरमध्ये अजुनही कपूर घराण्याची हवेली आहे. 

मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने केवळ भारतातीलंच नाही तर जगभरातील चाहत्यांमध्ये दुःखाच वातावरण आहे. पाकिस्तानमध्येही बॉलीवूडच्या कलाकारांना विशेष पसंत केलं जातं. पहिले इरफान खान आणि मग ऋषी कपूर यांच्या निधनाने पाकिस्तानमधील अनेक मोठ्या व्यक्तींनी दुःख व्यक्त केलंय. ऋषी कपूर यांचं पाकिस्तानसोबत जुनं नातं आहे. पेशावरमध्ये अजुनही कपूर घराण्याची हवेली आहे. 

हे ही वाचा: ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी ऐकून फोनवरंच राकेश रोशन यांना कोसळलं रडू, रणबीर कपूरने सावरलं..

पेशावर मधील किस्सा ख्वानी बाजारात कपूर हवेली आहे. ऋषी कपूर यांचे आजोबा आणि दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा जन्म या हवेलीत झाला होता.

Kapoors' ancestral home in Peshawar crumbling - Movies News

याच हवेलीमध्ये पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा आणि अभिनेते राज कपूर यांचा जन्मही इथे झाला होता. या हवेलीला आता 'कपूर हवेली' नावाने ओळखलं जातं.

Kapoor Haveli - Wikipedia

२०१८ मध्ये या हवेलीला म्युझियम बनवलं गेलं. ही हवेली भारत-पाकिस्तान वेगळे होण्याआधी १९१८-१९२२ मध्ये निर्माण केली गेली होती. पृथ्वीराज कपूर यांचे वडिल बशेश्वरनाथ यांनी ही हवेली बनवली होती. बशेश्वरनाथ उपनिरिक्षक होते. पृथ्वीराज हे त्यांच्या घराण्यातील पहिले अभिनेते होते.

Pakistan to Convert Rishi Kapoor's House in Peshawar into Museum

जवळपास ४० ते ५० खोल्या असलेली ही हवेली एकेकाळी खूप आलिशान होती. फोटोंमध्ये याच्या देखभालीची उणीव तुम्हाला नक्कीच दिसून येत असेल. अभिनेते दिलीप कुमार यांचं वंशपरंपरागत घर देखील ख्वानी बाजारच्या जवळंच आहे. सुरुवातीला ही हवेली ५ मजल्यांची होती. मात्र भूकंपामुळे निर्माण झालेल्या चिरांमुळे त्याचे वरिल ३ मजले उध्वस्त केले गेले. असं असूनही हवेली डोळ्यात भरण्यासारखीच आहे.

Rishi Kapoor: Rishi Kapoor's ancestral home in Peshawar to become ...

१९९९० मध्ये ऋषी ही हवेली पाहण्यासाठी पेशावरमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी तिथून याची माती आपल्यासोबत आणली होती. 

२०१६ मध्ये ऋषी कपूर यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला होता ज्याते ते पेशावर हवेलीमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळालं.

त्यांनी लिहिलं होतं, 'कोणीतरी ही पाठवली होती. या फोटोत मी आणि रणधीर पेशावर मधील कपूर हवेलीच्या बाहेर दिसत आहोत. जसं फोटोमध्ये दिसतंय आमचं खूप छानरित्या स्वागत केलं गेलं होतं.' 

Rishi Kapoor on Twitter: "Somebody sent this. Picture showing ...

२०१७ मध्ये ऋषी कपूर यांनी एका ट्वीटमध्ये लिहिलं होतं, 'मी ६५ वर्षाचा आहे आणि मरण्याआधी पाकिस्तान बघू इच्छितो. मला असं वाटतं की माझ्या मुलांनी त्यांची खरी मुळं पहावीत.' 

rishi kapoor death he want again revisit to pakistan kapoor haveli


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rishi kapoor death he want again revisit to pakistan kapoor haveli