अभिनेता ऋषी कपूर यांनी चक्क कोणाचे आभार मानलेत?

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

मुंबई : ऋषी कपूर सध्या चित्रपटातील भूमिकांऐवजी विनोदी, वादग्रस्त ट्विट करण्यासाठी प्रसिध्द होत आहेत. नुकतेच चिंटू काकांनी आणखी एक ट्विट करून चक्क गौरी खान यांचे आभार मानले आहेत. ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूरच्या घराचे इंटेरियर करण्यासाठी त्यांनी हे आभार प्रदर्शन केले आहे.
ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे,"वास्तू'खूप सुंदर. गौरी खान! रणबीरच्या घराला तू खरचं"घर'बनवलं आहेस. रणबीरच्या घराची खूप छान पद्धतीने सजावट केली आहे. मी आणि नीतू आम्ही दोघंही ते बघून चकित झालो आहे,धन्यवाद.''

शाहरुख खानची पत्नी गौरी खान इंटिरीअर डिझायनर आहे. गौरीने नुकतेच रणबीरच्या घराचे काम पूर्ण झाल्यावर इंटेरियरच्या कामाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. गौरीने व्यावसायिकदृष्ट्या हृतिक रोशनची पत्नी सुझेन खानच्यासह भागीदारीत एक्‍सक्‍लूजिव इंटेरियर प्रोजेक्‍ट करण्यास सुरुवात केली. तसेच, तिने स्वतःचे "डिझयनर सेल' नावाचे इंटेरियर स्टोर सुरू केले आहे.

Rishi Kapoor @chintskap

"Vastu" Wonderful! Gauri Khan! You have made a home out of Ranbir's house. Beautifully done! Both Neetu and me are overwhelmed. Thank you!

Web Title: Rishi Kapoor thanks Gauri Khan for ‘beautifully’ done Ranbir’s new home