ऋषी कपूरने मानले गौरीचे आभार

वृत्तसंस्था
बुधवार, 14 डिसेंबर 2016

बॉलिवूडमधील अनेक अभिनेते सोशल मीडियावर सक्रिय असतात. ऋषी कपूर हे त्यापैकी एक आहेत. नुकतेच त्यांनी एक ट्‌विट करून गौरी खान हिचे आभार मानले आहेत. ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूरच्या घराचे इंटेरिअर गौरीने केले आहे. त्याबद्दल त्यांनी हे आभार प्रदर्शन केले आहे.

ऋषी कपूर यांनी ट्‌विटमध्ये म्हटले आहे, 'वास्तू'खूप सुंदर. गौरी खान! रणबीरच्या घराला तू खरच 'घर' बनवले आहेस. रणबीरच्या घराची खूप छान पद्धतीने सजावट केली आहे. मी आणि नीतू आम्ही दोघेही ते बघून चकित झालो आहे, धन्यवाद.''

शाहरुख खानची पत्नी गौरी खान इंटिरेअर डिझायनर आहे. गौरीने इंटेरिअरच्या कामाची छायाचित्रे इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत. हृतिक रोशनची पत्नी सुझेन खानसह भागीदारीत काम करण्यास तिने सुरवात केली, तसेच "डिझायनर सेल' नावाचे इंटेरियर स्टोअरही गौरीने सुरू केले आहे.

Web Title: rishi kapoor thanks gauri khan