ट्विटरवरून अभिनेते ऋषी कपूर यांची पाक क्रिकेटवर टीका

टीम ई सकाळ
शुक्रवार, 16 जून 2017

ट्विटरवरील आपल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असलेले अभिनेते ऋषी कपूर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. चॅम्पियन्स करंडकामध्ये होणार्या अंतिम फेरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. 

मुंबई : ट्विटरवरील आपल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असलेले अभिनेते ऋषी कपूर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. चॅम्पियन्स करंडकामध्ये होणार्या अंतिम फेरीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. 

 

 

कपूर यांनी ट्विट करताना पाक क्रिकेट बोर्डाला सूचक शब्दात सुनावले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, तुम्ही तुमची टीम पाठवाच. यापुर्वी तुम्ही खोखो, हाॅकीचे संघही पाठवले होतेच. या रविवारी अंतिम सामना आहेच, पण फादर्स डे आहे हे विसरू नका.

त्यांच्या या ट्विटने पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष ऋषी कपूर यांच्याकडे वळले आहे. पुढे ट्विट करताना ते म्हणतात, एकवेळ सामना तुम्ही जिंका. पण दहशतबाद थांबवा. 

Web Title: Rishi kapoors troll PCB