
Riteish Deshmukh Video: आजीसोबतचं 'हे' नातं पाहून तुम्हीही म्हणाल, रितेशची मुलं म्हणजे दृष्ट लागण्याजोगी..
Riteish Deshmukh New Video News: अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या मुलांवर केलेले संस्कार हे जगजाहीर आहेत. पापाराझींसमोर रितेशची मुलं रिआन आणि राहील अनेकदा नम्रपणे हात जोडून उभे असतात.
रितेश आणि जिनिलिया या दोघांनी मुलांवर केलेले हेच संस्कार सर्वांना आवडतात. आता रितेश आणि जिनिलिया यांची मुलं रिआन आणि राहील यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहून दृष्ट लागण्याजोगे सारे, अशीच भावना मनात येते.
(riteish deshmukh and genelia deshmukh son riaan & Rahyl gave their football medals to their Aajimaa for Mother’s Day)
रियान आणि राहिल यांनी मदर्स डे निमित्त त्यांच्या आजीमाला फुटबॉल मेडल दिले. आयुष्यातील काही क्षण अनमोल असतात. तुमच्या पालकांसोबत वेळ घालवा आणि मुलांसोबत वेळ घालवा.
असं कॅप्शन लिहून रितेशने मुलांचा हा व्हिडिओ शेयर केलाय. एकूणच रितेशच्या मुलांचं त्यांच्या आजीसोबत असलेलं आदरयुक्त प्रेमळ नातं दिसून येतंय.
रितेशची मुलं रियान आणि राहिल हे विविध खेळांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवत असतात. सध्याची पिढी ही मोबाईल गेम खेळण्यात व्यस्त असताना जिनिलिया आणि रितेश मुलांच्या मैदानी खेळ खेळण्यात प्रोत्साहन देत असतात.
रियान आणि राहिल यांचं त्यांच्या आजीसोबत सुद्धा प्रेमळ नातं दिसून येतं. विलासरावांची पत्नी म्हणजे रितेशची आई सुद्धा त्याच्या मुलांवर संस्कार करताना दिसतात. रियान आणि राहिल यांच्याही मनात आजीबद्दल विशेष प्रेम आहे हेच दिसतं.
दरम्यान रितेश - जिनिलिया या जोडीच्या वेड सिनेमाने १०० दिवस पूर्ण करून कमाईत सुद्धा बाजी मारली आहे. वेडने आतापर्यंत ७४ कोटींचा टप्पा पूर्ण केलाय. जगभरात वेडने ७४ कोटींपेक्षा जास्त कमाई केली असून भारतात वेडने ६०. ६७ कोटींची कमाई केली आहे.
अशाप्रकारे सैराटनंतर वेड सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरल्याची शक्यता आहे. वेड निमित्ताने मराठी सिनेमांची नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात झालीय. वेड सध्या Hotstar या ott प्लॅटफॉर्मवर बघू शकता.